-
वियदगंगा – VIYAD GANGAA
वियदगंगा भरुन वाहे तन-मनाने सजल आहे दगड-धोंडे खडक पात्री पण किनारा मृदुल आहे धवल साडी हरित बुट्टी विविध रंगी पदर मोठा लहरणारी झुळुक भासे तरुण कन्या चपल आहे डुलत चाले लवुन बोले भडक माथी उदक ओते खुदुखुदू ही हसवितेरे गझल माझी हझल आहे गगन काळे गडद होता विहरती या जलदमाला दव लकाके झरुन गाली पवन…
-
गुज-गोष्टी – GUJ- GOSHTEE
मनाची चाल मोठी मनाला पंख वाऱ्याचे किती स्वप्ने तुझी आई तुझे आभाळ ताऱ्यांचे कुठे असशील आता कोण सांगेल मज गुज-गोष्टी किती गझला तुझ्यासाठी मला मोल तव चाऱ्याचे कशाला रे तुला शेती हवी बागायती माझी हवी तर मग भरावे तूच पैसे शेतसाऱ्याचे पुरे झाले बहाणे लाडक्या ओलांड सीमेला नको कौतुक मला सांगू नजरभेटी नजाऱ्यांचे किती थोतांड…
-
समाधान – SAMAADHAAN
अता पूर्ण माझे समाधान झाले खुले शस्त्र माझे पुन्हा म्यान झाले डुले तृप्त काया गव्हाची गव्हाळी पहाटे दवाचे उषःपान झाले इथे झुंजल्या वृक्ष वेली तरूही किती कोवळे हे पुन्हा रान झाले निळीभोर स्वप्ने उशाशी कळ्यांच्या नभी चांदण्यांचे निशागान झाले असे सत्य सुंदर वचन जाणते मी स्मरोनी शिवाला खरे ध्यान झाले वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०…
-
कवीकूल – KAVEE KOOL
अजूनी उरी हे जुने दुःख ताजे कुणी पेटवीले पुन्हा शेत त्याचे मुक्याने किती यातना सोसल्या तू अता वारियाने सुके पान वाजे इथे कागदी नाव पाण्यात माझी तिथे सागराची निळी लाट गाजे हिऱ्या-माणकांचा मला सोस नाही मला भावते फक्त निर्भेळ नाते नको भेट तुमची नको मैफिलीही इथे या वहीवर गझल मुक्त नाचे तुम्ही अर्थ काढा तुम्ही…
-
खिशांना पुजावे – KHISHAANAA PUJAAVE
दिवाळीत कोणी दिव्यांना पुजावे कुणी ठोकलेल्या बुडांना पुजावे खिळे ठोकताना कधी बोट चेपे म्हणोनीच बत्ते विळ्यांना पुजावे खलाचे वजन या तुला पेलवेना सहज पेलती त्या कळ्यांना पुजावे फुका ना तुम्हाला फुले रोज मिळती कळ्या फुलविणाऱ्या झऱ्यांना पुजावे सदा दान देती रिकामेच होती जुन्या फाटक्या त्या खिशांना पुजावे वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २० लगावली – ल…
-
भुजंग – BHUJANGA
गझल सळसळूदे भुजंगाप्रमाणे तिच्या नेत्रज्योती कुरंगाप्रमाणे गझल मैफिलीला अता रंग चढला तुझी साथ मजला मृदंगाप्रमाणे अता दोर आहे धरेच्याच हाती भरारे गझल ही पतंगाप्रमाणे मुला-माणसांनी फुला-पाखरांनी गझल गुणगुणावी अभंगाप्रमाणे जली राजहंसा तुझा डौल भारी गझल त्यात माझी तरंगाप्रमाणे वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २० लगावली – ल गा गा /ल गा गा/ ल गा गा /ल…
-
चित्रदर्शी – CHITRADARSHEE
किती द्यायचे मी तुझे सांग मजला अता फेडुदेरे पुरे पांग मजला नवे पंख भारी मला दो मिळाले तुझ्या दर्शनाला नको रांग मजला उसळते खिदळते गझल चित्रदर्शी तिचा पूर्ण प्याला जणू भांग मजला पुन्हा कुंडल्या या मुक्या मौन झाल्या दवाने लिहूदेत पंचांग मजला कुणी दूर गेले कुणी पार झाले गझल देतसे ना कधी टांग मजला खरा…