Category: Ghazal

  • आंधळे – AANDHALE

    ते रान का कोमेजले वाऱ्यास कोणी रोखले त्यांचा छुपा हल्ला तरी नाहीच मी भांबावले माझे न काही बिघडले त्यांचेच त्यांना भोवले हा प्रश्न पण छळतो मला विपरीत कोणी वाचले ते ठार होते आंधळे तेव्हांच मी ते जाणले गुन्हे करानी चोरटे नरकात कुठल्या चालले ये पावसा बिनधास्त ये आताच घर शाकारले वृत्त – संयुत, मात्रा १४…

  • बाजार – BAAJAAR

    थंडावता बाजार हा मंदावला व्यापार हा प्राशून पाणी क्षारमय झाला कमी आजार हा टाळूनिया पुनरुक्तिला आला तिला आकार हा देताच दगडा रूप मी झाला सगुण साकार हा वाटून सारी बंडले विझला अता अंगार हा झाला किती कृतकृत्य तो उच्चारता आभार हा गेला तसा आला पुन्हा परतूनिया साभार हा वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली –…

  • आवाज – AAVAAJ

    आवाज माझा आतला काट्यावरी मी तोलला तो कोण होता पाठिशी सांभाळ मजला बोलला मौनात होता आरसा मी फोडता पण वाजला रानात धेनू हंबरे ऐकून स्वर मुरलीतला येताच भरती सागरा तो लाट बनुनी गाजला सोडून होडी हातची पाण्यात तो झेपावला मम भावना भवनाशिनी वाचून तोही थांबला वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल…

  • सामना – SAAMANAA

    टोकावरी जाऊ नको गेल्यावरी नाचू नको थांबून तू न्याहाळ ते टोकात पण गुंतू नको करशील जेव्हा सामना नजरेस तू टाळू नको आरास तू केली जरी ते मुखवटे घालू नको ओढावया नाकास तव हातामधे देऊ नको जे पाप पुन्हा उगवते जाळून ये गाडू नको कमरेस जे गुंडाळले डोक्यास गुंडाळू नको वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली…

  • वेंधळी – VENDHALEE

    चंद्रावरी हे पोचले ते  मंगळाशी भांडले असुनी कुरूप नि वेंधळी मजलाच त्यांनी निवडले येताच त्यांच्या आड तो सूर्यास त्यांनी रोखले नक्षत्र ताऱ्यांना कसे भंडावुनी मी सोडले होते किती मतिमंद ते वातात कोणी बरळले गर्विष्ठ मी आहे जरी बारा कसे ना वाजले सांगा सुनेत्राला खरे म्हणताच का ते कोपले वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली –…

  • तीळपोळी – TEEL POLEE

    बाभूळ छाया लांबली काट्यांसवे शेफारली मउ तीळपोळी सानशी साऱ्यांमधे मी वाटली सैलावली अभ्रे नभी पाठीवरी मी टाचली गालावरी पडता खळी तो न पण ती लाजली माझी न त्याची ती परी त्याचीच वाटे सावली गौरीपरी हिमगौर ती आहे छबेली बाहुली माझी सुनेत्रा वासरी टोचून काटे फाडली वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल…

  • पावित्र्य – PAAVITRYA

    त्या लाडक्याला संपवू अन दोडक्याला गोठवू आभाळमाया दाटली मायेस तिचिया आठवू झोळीतल्या तान्ह्यासवे त्या द्वारकेला जोजवू आकाश आता मौन ना त्यालाच पुन्हा पेटवू आकाश जेव्हा बरसते त्यातील ठिणग्या साठवू काया जरी ती नागडी पावित्र्य त्यातिल दाखवू तृष्णा सुनेत्रा ना जरी हृदयास कोमल गाजवू वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा…