Category: Ghazal

  • फांदीवरती – FAANDIVARATI

    प्राणपाखरे धडपड करती झुले शोधण्या फांदीवरती जाळे घेउन फिरे पारधी खिळे ठोकण्या फांदीवरती झाडांवरती पर्णपिसारा फळे पहुडली पानोपानी नजर तीक्ष्ण मम मनहरिणाची फुले शोधण्या फांदीवरती लाखो दवबिंदू ओघळती मोत्यांसम तरुतळी साठती तृण वनदेवी कुदळ आणती तळे खोदण्या फांदीवरती रंगत जाता सुरेल मैफल पहाट तारा नभी उगवला विसरुन गेल्या शासनदेवी विळे, ओढण्या फांदीवरती गझल गुणाची कणखर…

  • डंख – DANKH

    चेहरे दो दो इतुके मोहक बासरीचे दो पंख जणू आरशामध्ये प्रतिमा लोभस आगगाडीची लिंक जणू वर्षतो धो धो मुखपृष्ठावर श्रावणीचा पाऊस निळा अक्षरे पानी गुलकंदासम लेखणी गाळे इंक जणू धूर वायूचे उठता वादळ अडकित्त्याने काप मणी त्यातला काटा फुरसे घोणस नागिणीचा मी डंख जणू ढोकळा पिझ्झा कटलेटावर ताव मारूया आज पुन्हा सारवू मोठे तिरके अंगण…

  • बनेन दाता – BANEN DATA

    उत्तम शुचिता धर्म ओळखुन नमू जिनाला मर्म ओळखुन पर्युषण हे पर्वच प्रिय मज बनेन दाता कर्म ओळखुन

  • मणका – MANAKA

    मणका माझा कणां पाठिचा नागिण कट्टर अनल जणू मस्तक माझे फडा दहाचा कृष्ण मेघना सजल जणू या मणक्याला लोंबकळूनी कैक जणांनी दगा दिला कुरकुरतो पण अजुन टिकोनी विश्वासाठी नवल जणू मणक्यावरती गझल उभी ही राज्य कराया जगावरी शिडीवरूनी कळस पूजन्या आतुरलेले कमल जणू अगीनगाडी मणक्यावरुनी आयटीत जाते ऐटीत ग धूर न ओके इंजिन पुष्पक विमान…

  • बगीरा – BAGIRAA

    कसा यायचा तो उशीरा उशीरा म्हणे तोच येतो बगीरा उशीरा लगागा लगागा लगागा लगागा स्वतःलाच झापे समीरा उशीरा दिवाणी दिवाणा नवे स्वप्न दावी खरी भेटले मी शिशीरा उशीरा खरे सत्य सुंदर मला ठाव आहे कळा लागल्या मूढ पीरा उशीरा सुनेत्रात मधुरा शशांक सु मनाचे समवशरण गाठे फकीरा उशीरा अक्षरगण वृत्त — मात्रा २०

  • सुमार भाव – SUMAR BHAV

    मधुर फळे अती कडू तुझ्यामुळेच जाहली बिया जरी न जून त्या मुळे खिळेच जाहली सुरुंग लावुनी भुईत ध्वस्त टेकडी दिसे इमारती नव्या उभ्या तळी बिळेच जाहली उन्हात वावरे फिरे थकून जाय रोज ती वहायचे खळाळुनी तरी तळेच जाहली नयन निळे नजर खुळी पडून पाकळ्यांवरी फुलांवरील अष्टगंध अन टिळेच जाहली सुमार भावसंपदा तरी म्हणे परीच मी…

  • शेणकूट – SheNakooT

    धान्यधून्य अंगणात पारव्यास घाल भूक लागलीय त्यास जेवण्यास घाल कुजट मिट्ट लाकडास ऊन देच आज लागलीय ओल त्यास वाळण्यास घाल शेणकूट घे वरून घासलेट ओत चूल पेटवून त्यात ओंडक्यास घाल तेल कडक तापवून उडव मोहरीस फोडणीत स्वच्छ धुवुन माळव्यास घाल फोड फोड हालवून वाफवून छान तिखट मीठ वरुन त्यात मुरवण्यास घाल गझल-अक्षरगण वृत्त,मात्रा २१ लगावली-गालगाल/गालगाल/गालगालगाल/