Category: Ghazal

  • आस आहे – AAS AAHE

    बोलती कावळे आस आहे कोणती नाकळे आस आहे काक ना स्पर्शिती पिंड जेव्हा सांगती बावळे आस आहे पाहती चोरुनी जे नको ते ते जरी सोवळे आस आहे मंदिरी अंतरी ज्योत तेवे भिंत का काजळे आस आहे आवळे वाटुनी चोरलेले लाटती कोहळे आस आहे वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल…

  • कोन – KON

    सांग गझला कशाने लिहू मी हात मिटला कशाने लिहू मी धारना राहिली लेखणीला टाक पिचला कशाने लिहू मी प्राशुनी नीर सारे नदीचे पेन फुटला कशाने लिहू मी पेलता दो करी जड धनूला बाण सुटला कशाने लिहू मी नाव मेंदीतले रेख म्हणशी कोन तुटला कशाने लिहू मी वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल…

  • माकडे – MAAKADE

    तीनही लाजली माकडे माणसे जाहली माकडे लाजणे भावले रे मला लाजता भावली माकडे वाकुल्या दाविती बालके जाणुनी नाचली माकडे तोतये दाबिती जेधवा तापुनी कावली माकडे जोंधळा सांडता भूवरी चांदणे प्यायली माकडे अंतरी गाजता लाटही अंबरी पोचली माकडे तू सुनेत्रांस दो चुंबिता खेळुनी झोपली माकडे वृत्त – गा ल गा/गा ल गा/गा ल गा/ (वीरलक्ष्मी)  …

  • मज मना – MAJ MANAA

    मज मना लाजणे आवडे पापण्या झुकविणे आवडे राग तो गिळुनिया अंतरी अधर तव दाबणे आवडे कावरी बावरी लोचने चोरुनी वाचणे आवडे हृदय तू बंद केले जरी त्यात मज राहणे आवडे मी समोरी असोनी तुझ्या आडुनी पाहणे आवडे टोमणे मारणे बासना मज मधुर बोलणे आवडे दे सुनेत्रा गझल नित नवी त्यात मज डुंबणे आवडे वृत्त –…

  • रे मना – RE MANAA

    आज तू बोलना रे मना मौन तू त्यागना रे मना सावल्या सोडुनी चालल्या भटकणे सोडना रे मना पांगली माणसे जवळची ती पुन्हा जोडना रे मना गोडवा चाखण्या प्रीतिचा विकृती जाळना रे मना रडविले तू मला कैकदा मजसवे हासना रे मना मैत्र हे अंतरी टिकविण्या मोकळे होचना रे मना गा पुन्हा गीत तू ते जुने भिजवुनी…

  • पद्मावति – PADMAAVATI

    नको लिहू तू, नको श्रमू तू, गझला कोणी, तुझ्या विके घडीभराचा, घेच विसावा, पुढे दाटले, गच्च धुके हळूहळू अरुणोदय होइल, शांत झोपल्या, धरेवरी दिशा स्वतःही, निघे पूजना, वस्त्र तिचे मृदु, धूत फिके स्वच्छ झाडल्या, पदपथावरी, प्राजक्ताचा, सडा पडे भल्या पहाटे, वेचत पुष्पे, कोणी बालक, गणित शिके पालखीत वनदेवी बसता, चवऱ्या ढाळी, रानजुई स्वागत करण्या, पद्मावतिचे,…

  • मयुरबाला – MAYUR-BAALAA

    निघे सासुराला जरी मेघमाला नको नीर सांडू म्हणे पावसाला न्यहाळू कशाला घनांची निळाई धरेवर निळी नाचता मयुरबाला सई ये प्रभाती फुले वेच सारी करू गूजगोष्टी बसोनी उन्हाला बरस पारिजाता नवी मांड चित्रे जसे चंद्र तारे घरा-अंगणाला झरा बागडे हा पुन्हा परसदारी मला सांगतो ये बसू वारियाला नभी पाखरांचे थवे गात झुलता मधुर गीत गाण्या गळा…