Category: Ghazal

  • गझलकारिणी -GAZAL-KAARINHEE

    गझला लिहिते मी कवयित्री काय द्यायचे नाव मला गझलकार की गझलकारिणी प्रश्न सोडवुन पाव मला जरी तुला ना सुचते सुंदर मनाजोगते नाम अता सुजला सुफला जमिनीवरचे दे गझलांचे गाव मला मी तर साकी नाजुक कणखर चषक भराया उभी इथे प्राशुन त्यातिल पेय नशीले मोज दिलेले घाव मला सौदा केला ना काव्याचा ना माझ्या स्त्रीदेहाचा निश्चय…

  • अबोध सळसळ – ABODH SALHSALH

    मायावी चित्तातिल खळबळ कधी प्रसाविते काव्याला नेणिवेतली अबोध सळसळ कधी प्रसाविते काव्याला नेत्र पापण्या मिटती जेव्हा भावभावना कोंडाया मोत्यांसम अश्रूंची सळसळ कधी प्रसाविते काव्याला संधिकालचे रंग लोपता छायांनी मन आक्रमिता कातरसमयीची हर हळहळ कधी प्रसाविते काव्याला नकळत काटे करिता जखमा गुलाबवेड्या हृदयाला सुवासिक रक्ताची भळभळ कधी प्रसाविते काव्याला खोल गूढ मौनी डोहाला वळसा घालित जाणाऱ्या…

  • तुझ्याआधी – TUZYAA AADHEE

    तुझ्याआधी घरी माझ्या पाऊस आला कुणासाठी घरी माझ्या पाऊस आला चिंब काया मोहराया रिंगण धराया चंद्रमौळी घरी माझ्या पाऊस आला अंतरीचे बोल बोली ऐकून टिपण्या देत हाळी घरी माझ्या पाऊस आला झरे ओढे वाहताती संगीत देण्या भरत पाणी घरी माझ्या पाऊस आला तावदाने वाजवूनी डोकावत हळू म्हणत गाणी घरी माझ्या पाऊस आला सुनेत्राला भेटावया इथे…

  • तांबड – TAAMBAD

    पूर्व दिशेला तांबड फुटता तप्त जाहले रक्तिम्यात त्या बुडून जाता रिक्त जाहले पहिल्या धारेच्या गझलेने तृप्त जाहले चवीचवीने तिला प्राशिता मुक्त जाहले पहाटवारे टपले होते बोल टिपाया चुंबून त्याला कषाय माझे गुप्त जाहले भावभावना सांडत होत्या पापण्यांतुनी शिस्त लावण्यासाठी त्यांना सक्त जाहले चोर लुटारू लुटण्या येता तुला ‘सुनेत्रा’ अवगुण उघडे गुण सारे मम सुप्त जाहले…

  • छळवादी – CHAALHAVAADEE

    छळवादी रिपु पूर्ण जळूदे शुद्ध जलाने हृदय भरूदे मनात किंतू कुणाच्याच ना हीच अवस्था खरी टिकूदे माझ्याही अधरातुन झरझर तुझ्या गझलमाला बरसूदे चंचल हरिणी शांत रागिणी तिच्या उरी संगीत झरूदे तुडुंब विहिरी जोहड धरणे तळी जलाशय तृप्त असूदे गाठवलेले गोठवलेले मणी मोकळे घन वितळूदे मित्र मैत्रिणींसंगे निर्भर मुक्त ‘सुनेत्रा’ ला विहरूदे मात्रावृत्त(१६ मात्रा)

  • सुरस खरी – SURAS KHAREE

    जमेल तेव्हा ये सवडीने गोष्ट ऐकण्या सुरस खरी रसिक जनांना मनभावन पण तुझ्यासाठी ती कुरस खरी नकोच तोरा मिरची पुढती तीच तिखट अन सरस खरी नकोस गर्जू ओठ फाकुनी नेत्रांमधुनी बरस खरी एक फूलही सुगंध भरले पुरे त्यांचिया साक्षीला हव्या कशाला भेटी वस्तू प्रेमासाठी तरस खरी नकोच स्पर्धा नको परीक्षा नजर भिडव नजरेला तू तुझ्या…

  • छत्री – CHHATREE

    छत्री घेउन निळी निळी फिरायचे मी जळी स्थळी पाऊस धार ये धो धो तुडुंब भरण्या धरण तळी कडेकपारी या धुंडू खळखळणाऱ्या शुभ्र घळी पानापानांवरी हसे प्राजक्ताची कळी कळी श्रावण बरसे रंगसरी इंद्रधनूला मार हळी मात्रावृत्त(१४ मात्रा)