-
कोण – KON
गडगड गगनी हसतो कोण नभात मोती दळतो कोण ढगात कापुस भरतो कोण घनामधूनी झरतो कोण पहाट फुलता वाटत मोद फुलांमधूनी हसतो कोण निळ्या समुद्रा भेटायास नदीत लाटा भरतो कोण अंधाराला भेदायास विजेस लखलख म्हणतो कोण जहाज गलबत हलवायास शिडात वारा भरतो कोण वळीव येता भिजावयास चल चल मजला म्हणतो कोण मात्रावृत्त – (८+७=१५ मात्रा)
-
पाखरां भरवेन मी – PAAKHARAA BHARAVEN MEE
पाखरां भरवेन मी जीवना फुलवेन मी शिंपल्यात पडूनिया मौक्तिका घडवेन मी वीज देही नाचता अंबरी तळपेन मी उगवण्या पुण्यांकुरा मृत्तिका भिजवेन मी जतन करण्या प्रीतिला शुद्धता घडवेन मी वृत्त – गा ल गा गा, गा ल गा.
-
पुरे जाहले साकी – PURE JAAHALE SAAKEE
पुन्हा पुन्हा का भरिशि प्याला पुरे जाहले साकी हृदय भडाग्नी पूर्ण निमाला पुरे जाहले साकी कोळुन प्याले अक्षर मात्रा उकार काना वळणे विसर्ग उरला फक्त तळाला पुरे जाहले साकी दवात भिजणे सुकुन तडकणे मिरवत मिरवत टिकणे चक्र अघोरी हवे कशाला पुरे जाहले साकी भ्रमर भृंग हे अवती भवती फूलपाखरू बघते मधू वाटणे सांग फुलाला पुरे…
-
कशाला या उठाठेवी – KASHAALAA YAA UTHAATHEVEE
कशाला या उठाठेवी, जना सांगावया काही उठा बोला मना सांगा, लिहाया लीलया काही कुणी नाहीच मोठारे, तसा नाहीच छोटाही अता छोटे बनूयाहो, बरे बोलावया काही कशी भाषा फुलावी रे, असे हे मौन लोकांचे जरा भांडा स्वतःशीही, चुका टाळावया काही नवी गीते रचू गाऊ, क्षमेने क्रोध जाळूया अहिंसा धर्म जीवांचा, खरा जाणावया काही करूया शांत पृथ्वीला,…
-
पुरे जिवाशी खेळ खेळणे – PURE JIVAASHEE KHEL KHELANE
पुरे जिवाशी खेळ खेळणे काठावरुनी ऋतू जाणणे आषाढातिल मेघ पालखी फाल्गुन अस्सल रंग पारखी आश्विन मासी धवल चांदणे वैशाखाची कनक झळाळी कार्तिकातली जर्द नव्हाळी पौषामधले गगन देखणे चैत्र फुलोरा मृदुल पालवी भाद्रपदातिल ऊन सावली ज्येष्ठामध्ये आत्म पाहणे मार्गशीर्ष मोहक मनभावन गुलाबजल शिंपाया श्रावण माघामध्ये निवत तापणे
-
घेऊ थोडी – GHEOO THODEE
मुस्तज़ाद गझल कधीच नाही जरी घेतली घेऊ थोडी भरून प्याले तरी झेपली घेऊ थोडी दिल्यास तू ज्या जखमा मृगजळ करिती खळखळ नाद ऐकुनी नशा पेटली घेऊ थोडी करावयाला जशी साठवण तुझी आठवण दिव्यात भरता वात तेवली घेऊ थोडी पैशांची या मिटण्या चणचण केली वणवण थकल्यावरती पाठ टेकली घेऊ थोडी उपवासाने गळून गेली पूजा केली करुन…
-
संपदा घेऊन ये – SAMPADAA GHEOON YE
रंगल्या पूर्वेसवे तू रंग ते लेऊन ये कोवळ्या किरणांसवे तू संपदा घेऊन ये गातसे आकाश गझला पंख तू पसरून ये कुंकवाला शुभ्र भाळी आज तू रेखून ये कैद करण्या शृंखला या ठेवल्या नाहीत मी थांबली गाडी जरी ना साखळी खेचून ये येच उल्के भूवरी या बहरण्या फुलण्या गडे वाटली ‘भीती’ जरी ‘तिज’ अंबरी फेकून ये…