Category: Ghazal

  • मम सांजेचा रंग केशरी – MAM SANJECHAA RANG KESHAREE ( my saffron coloured evening)

    मम सांजेचा रंग केशरी निळी जांभळी निशा नाचरी प्रभात ल्याली हळदी शालू किती देखणी जरी बावरी सकाळ गोरी मस्त गव्हाळी विरघळलेली मधुर साखरी दुपार सोन्यासम झळझळते संध्या श्यामल दिसे लाजरी संधिकालची बेला सुंदर अधरांवरची जणू बासरी  

  • मंगल बेला – MANGAL BELAA (auspicious time)

    मंगल बेला हळदी शेला गझल विड्यांचा शायर ठेला मुखचंद्रावर मस्त तजेला सुंदर स्वप्ने हवी निशेला अमर्त्य आहे माझा चेला

  • तुळस मोगरा – TULHAS MOGARAA (basil and jasmine)

    ठेवू कोठे तुळस मोगरा गच्च दाटला हरित कोपरा काव्य बहरले पान-फुलांनी सैल जाहला देह चेहरा बैल उधळतिल हातामध्ये धरून ठेव तू घट्ट कासरा शेवटचे दिस गोड व्हावया हळू हळू थांबतो भोवरा मधुर फळांची बाग शिंपण्या आडामध्ये जाय पोहरा सुखी जाहली माझी बाळे ऐकव गझला अता शायरा चढून जाऊ डौलामध्ये वळणदार हा मस्त दादरा

  • ती – TEE (SHE)

    कळाया नव्याने मला सापडे ती सदा घोळ घाले तरी आवडे ती किती नाक अपरे नयन नीलकांती जणू बाहुली बोलते बोबडे ती तुझी बायको तिज कसे मी म्हणावे कधी सारवीते तुझे झोपडे ती तुला तीट लावे तुझी दृष्ट काढे तुला घालते अंगडे टोपडे ती बटा स्वैर उडता कुरळ कुंतलाच्या तया तेल भारीतले चोपडे ती जरी अर्घ्य…

  • ठेला – THELAA ((“betel leaf stall”)

    कविता मम शब्दांचा झेला रंगवून तिज घे शेजेला रम्य कल्पना खुले कागदी चित्रासम संध्येची बेला स्वातीचा शिंपला मनोरम अगणित पानांचा जणु ठेला शिवगंगा धरणीवर आली माळ जयश्री तृणबालेला घटिका मंगल जवळी आली घे मीना अंगावर शेला मात्रावृत्त – ८+८= १६ मात्रा

  • नवलाई – (novelty)

    मुक्तक लिहुकी गझल रुबाई म्हणू पाळणा की अंगाई नाव फुला तुज कुठले देऊ गुलबक्षी की चंपक जाई आतुन आतुन उचंबळे कढ अश्रू टिपण्या नकोच घाई पणती ठेऊ तुळशीपाशी परतुन येता गुरे नि गाई गोरज समयी धूळ रंगते सूर्यास्ताची ही नवलाई मनात काहूर हृदयी हुरहुर आठवती दादा अन आई खट्याळ वारा पदर उडवितो शीळ घालुनी बाई…

  • कल्पनेने शोध घ्यावे – KALPANENE SHODH GHYAVE (even today we should explore with imagination)

    कल्पनेने शोध घ्यावे आजही मोहनेने  मोहरावे आजही कंचनी काया फुलांची मोहरे ज्योतिने ते रंग प्यावे आजही सोनियाच्या दागिन्यांना घालुनी वल्लरीने बागडावे आजही केतकीने माखुनी हळदी उन्हा सौरभाने फ़ुलुन यावे आजही रेखुनी नयनात काजळ रेषिका अनुपमेने मुक्त गावे आजही मंजिरी वृन्दावनी या विखुरल्या मृण्मयीने बीज ल्यावे आजही बासरी चित्रात घुमते का तरी अलकनंदे तू झुरावे आजही…