Category: Ghazal

  • सोनचाफा – SON CHAAFAA

    बेधुंद होउनी तू हा माळ सोनचाफा हृदयात तव मनीचा सांभाळ सोनचाफा अलवार भावनांनी तलवार देह होता प्रसवेल गीत रमणी ओढाळ सोनचाफा आहेच सुंदरी मी वेडात बोलता मी काढेल खोड पुन्हा नाठाळ सोनचाफा काढू नकोस अर्का टिकवून ठेव रंगा जाळीतुनी धुक्याच्या तू गाळ सोनचाफा झोपून मस्त रात्री झाले पुन्हा तवाने पडते मजेमजेने हे बाळ सोनचाफा वृत्त-…

  • आस धर तू – AAS DHAR TOO

    गरगरूदे जग जगाचा आस धर तू भिरभिरू दे मन मनाचा फास धर तू चाबरे हे लोक सारे शांत झाले बावर्यांचा कान आता खास धर तू आवरे मी गडबडीने पण तरीही ‘छान दिसते’  ही तिची बकवास धर तू माफ करतिल  सर्व गुरुजन ज्या क्षणी मज त्या तिथीला खाउनी उपवास धर तू त्या दिशीका वाटले तिज तरकले…

  • काटवट कणा – KAATVAT KANAA

    काटवट कणा खेळत्यात सुना वाकुन वाकुन करे लेक खुणा आली आली सासू उड टणाटणा देगं दे लुगडं उघडुन खणा वटवट सई करतीया जना उडदार काळा नवाच बांधना जावाई म्हणतो गाणं म्हण घना नको नको बापू पवाडाच  म्हणा ही नणंद मैना तिला तू वरना शिवारी जोंधळा डोलतोय फणा सुपातला दाणा जात्यात घालना म्हण म्हण ओवी खुंटा…

  • सोटा – SOTAA

    जुळेल आता खरी कुंडली दोघांचीसुद्धा नसेल आता वक्र नजर ग्रह गोलांचीसुद्धा बडबड आता पूर्ण मिटावी सग्यासोयऱ्यांची सरेल अंतर जुळतिल नाती टोकांचीसुद्धा वाट पाहणे शिक्षा नव्हती आनंदे सरली गीते लिहुनी भोगांची अन योगांचीसुद्धा तत्त्व जाणता धर्म जाहला प्रेमाची भाषा तीच असावी देहाची अन आत्म्याचीसुद्धा करे लेखणी तुझी ‘सुनेत्रा’ प्रहार सोट्याचा घेच काळजी लेखणीतल्या सोट्याचीसुद्धा मात्रावृत्त –…

  • सर्व कळव – SARV KALHAV

    शब्द फिरव वही भरव पटापटा धुणे बडव काना दे नीट गिरव मात्रांना अचुक बसव जमीन कस पालं उठव खण खड्डा परत बुजव पुष्पांनी देह सजव कवितेने हृदय फुलव सुनेत्रास सर्व कळव मात्रावृत्त – ६मात्रा

  • मंगल मंगळ – MANGAL MANGALH

    मंगल मंगळ नकोच कलकल चिखलच मलमल कमळे श्यामल वारा शीतल पांघर वाकळ उघडे कातळ पुष्पे कोमल मात्रावृत्त – ४ मात्रा

  • बावन गज – BAAVAN GAJ

    बावन गज मी टाकित गेले जमीन मोजाया सत्तावन फुट खोल उतरले विहीर खोदाया अक्षर अक्षर नीट पारखुन शब्द उभे केले शब्दांना मग वळव वळवले गझला बांधाया शुद्ध जलाने भिजवित गेले निळीभोर वसने चिंब भावना पुन्हा ठेवल्या उन्हात वाळाया चावुन चोथा करून विषया टोळ पुरे थकले निंदक आता बघा लागले मलाच टाळाया बरे जाहले सुटका झाली…