-
ओटी – OTI
मंगलमय मन संथ सावळी कृष्णामाई तू ग्रामस्थांची कुलस्वामिनी कृष्णामाई तू अष्टक देण्या भावफुलांनी कुमारिका आल्या प्रीतीने भर निसर्ग ओटी कृष्णामाई तू गवार भेंडी खिरा काकडी रक्तिमा साखरी कलिंगडातिल सत्त्व राखशी कृष्णामाई तू मुळा मुठा पवना कावेरी इंद्रायणी कऱ्हा गंगा नीरा झेलम तापी कृष्णामाई तू डोंगरातले निर्झर झरती बावखोल भरती मुक्त गझाला अभयारण्यी कृष्णामाई तू घटप्रभा…
-
पट – PAT
भावात देव आहे शोधा कुठे कपट ते आत्म्यास साक्ष ठेवा शोधा कपाट पट ते हिरव्यात कृष्ण धवला राखाडि लाल पिवळा चौकट बदाम किल्वर इस्पीक चार पट ते मम खेळ बिनपटाचा भासे जरी जनांना तत्त्वार्थ सूत्र खेळी जीवाजिवास पटते चाफ्यासमान सोने हळदीसमान औषध आराधनेत तपुनी होईल काळपट ते शेरात पाचव्या लिहितेय नाव माझे मांजापरी सुनेत्रा सत्यास…
-
जेव – JEV
शंका कशास कुठली निजभाव देव आहे शुद्धोपयोग जपणे ना देवघेव आहे पाऊल टाक पुढती रस्ता मिळेल सच्चा आत्म्यावरीच श्रद्धा कसले न भेव आहे चकली अनारशांचा दरवळ पिते रसोई रंगीत हे चिरोटे दुरडीत शेव आहे गाळून घाम जेव्हां होते कधी भुकेली रसनेंद्रियांस सुखवे तो शब्द जेव आहे जो तो जरी म्हणे मज ऐसीच तव तऱ्हा ही…
-
शबाब – SHABAAB
अंकात ना अडकते अक्षर शबाब होते मी आकडे न मोजे मौनी गुलाब होते कुठल्याच पुस्तकांचे माझे दुकान नाही माझी दुकानदारी माझा रुबाब होते अन्नास ठेव झाकुन होताच गार अलगद राहील ते टिकूनी ना ते खराब होते तो ब्रम्हदेश अस्सल माझाच वाटता मज चित्रात कृष्ण धवला रंगून बाब होते आहेच मी सुनेत्रा मम क्षात्रतेज तळपे मेयर…
-
आलेख – ALEKH
चपला … पत्रामधले भाव अक्षरी जांभुळलेले मेघ जणु जलद गतीने झरे लेखणी चपला घेते वेग जणु मुसळधार पाऊस कोसळे घनमालेतुन परसात परिमल भिजल्या बकुळ तळीचा दूर पोचला शहरात कांदा … पाऊस उभा थरथरतो कोसळताना होत जांभळा सळसळतो कोसळताना कापता वीज कांद्यासम उलगडताना पापण्यांतुनी झरझरतो कोसळताना पेग… लाटांतुन उसळे भरतीचा आवेग अंबरी झळकतो बिजलीचाआलेख चल घेऊ…
-
क्लास – CLASS
हे घड्याळाचेच काटे सांगती काटे टोचरे काटे फुलांतिल काढती काटे हाच तो काटा उरातिल दरवळे घमघम अंतरीचे शल्य त्याच्या प्राशती काटे वाट काट्यांची जरी ही साधना आहे प्रीतिने जाळ्यांस विणती जोडती काटे त्या रुमालानेच बांधा तोंड पोत्याचे जे नको ते क्लास त्यांना टाळती काटे बांग ऐकुन कोंबड्याची जाग आल्यावर अक्षरांवर मम फराटे ओढती काटे कोणते…
-
कुंदन – KUNDAN
संधीचे करते सोने.. शब्दांतुन झरते सोने … भावांनी मन भरल्यावर .. अंगांगी भरते सोने … गगन गिरीवर इंद्रधनू .. रंगी थरथरते सोने … अक्षर कुंदन माळ गळा.. मजला सावरते सोने … जांभुळ पेरुंच्या राशी .. गोडीत बहरते सोने … कुदळी खुरपी चालवता .. खोरी खरखरते सोने … गझल सुनेत्रा फुलदाणी .. शेरात बहरते सोने …