Category: Ghazal

  • तुडुंब – TUDUMB

    गाता भजन स्तवन उमटे हृदयात बिंब भावाचे गाता नवी गझल भिजले प्रतिबिंब चिंब भावाचे भरुनी नयन टपटप खिरत टिंबात लिंब सळसळता गाता सरोवरी हलले पाणी तुडुंब भावाचे लगावली – गागा/लगा/लगा/गागा/गागाल/गाल/गागागा/ मात्रा – १४/१४/ अक्षरगण वृत्त

  • पत्ता – PATTA

    जिनशासन सत सत्ता आहे गिरवायाला कित्ता आहे नको सुपाऱ्या कुटूस चिकन्या कातरण्या अडकित्ता आहे फतरी पान न करी पकडले हा हुकुमाचा पत्ता आहे खलात खलबत जिरवायाला संगमरवरी बत्ता आहे चित्रामध्ये गुरगुरणारा चित्तचोर नव चित्ता आहे दार मागचे खुले सर्वदा बार नव्हे तो गुत्ता आहे पगार महिना हजारात पण शतपट मिळतो भत्ता आहे भावपूर्ण अष्टक जयमाला…

  • मज्जाव – MAJJAV

    गाता गझल गीत लिहिले मक्त्यात नाव रक्ताने रक्तपात टळण्या केला पुन्हा मज्जाव रक्ताने पाऊलवाट मळवाया का रचू डाव रक्ताने शब्दांनी भळभळणारे का भरू घाव रक्ताने औषधा मसी ना उरली लेखणी शिशाविन पोकळ भेदले लक्ष्य बाणाने हेरून भाव रक्ताने चटक ना रक्त मासाची पुरविण्या लाड रसनेचे हे हृदय न कत्तलखाना बुडविण्या हाव रक्ताने सळसळते सत्य रक्तात…

  • दवा जादुई – DAVAA JADUI

    मीठ नि मिरची हिंग मोहरी नजरउतरवे भरभर मी तप्त निखारे दृष्ट काढुनी तिथे फेकते झरझर मी अंतर मिटण्या अंतरातले जपू कोणता मंतर मी प्रश्न मिटे पण शब्द वितळती भरे अक्षरी कर्पुर मी ..हुस्ने मतला १ जिनवाणीतिल भाव जोडुनी जिना बांधते मंदिर मी किणकिणणारे वात लहरता कधी त्यातले झुंबर मी … हुस्ने मतला २ वृत्त जपूकी…

  • हे तर सोने – HE TAR SONE

    मुस्तजाद गझल म्हणती कोणी ! फतरी पाने ! हे तर सोने !! मधुघट भरला ! शांत रसाने ! हे तर सोने ! तपली भिजली ! अबला कसली ! बलाच असली ! भर गाभारा ! मृदगंधाने ! हे तर सोने ! गजबज तारे ! अवस अंबरी ! पुनव अंतरी ! घे टिप संधी ! शर संधाने…

  • शांत रस – SHAANT RAS

    मौन ते बोलते जे सले टाळते भावना प्रकटते जादुई गाव ते गझल दल उमलते वाजती चाळ ते चांदणे गाळते रंगले वर्ण ते काफिया माळते गाल गा गाजते शांत रस पाजते

  • दीप दीप – DEEP DEEP

    दीप दीप लक्ष दीप तेवतात शांत दीप चंद्र शुक्र गगन दीप देह चैत्य आत्म दीप अंतरात लाव दीप गझल वात भाव दीप मम सुनेत्र दोन दीप