-
घुमट – GHUMAT
हृदय गर्भात रत्नत्रय झळझळाया भरुन कर कलशास करकमली वसे शासन जिनांचे पूर्ण ब्रह्मांडी खिरे वाणी त्रिदल कमली नको रोखूस श्वासाला नको चुकवूस नजरेला भिडव नेत्री भिजाया चिंब प्रतिबिंबी नयांच्या दोन धारांनी नयन कमली निळ्या नक्षत्र वाटांनी बरसता माळ हस्ताची नऊ रात्री झरे संगीत लहरींचे रसा माळेत ज्वालांच्या सलिल कमली ऋतूंचे सोहळे साही टिपाया नयन आतुरले…
-
मुन्ना मुन्नी – MUNNA MUNNI
आठवतो मज माझा कुरळ्या जावळातला मुन्ना मर्फी आठवते मज माझी गुबरी लेक बाहुली मुन्नी बर्फी मोठा झाला शिकला घडला संस्कारानी जिनधर्माच्या सत्य अहिंसा जपण्यासाठी लढला मुलगा मुन्ना मर्फी मोठी झाली कन्या शिकली गुपित जाणुनी स्वधर्म जपूनी कुटुंब अपुले सुखी व्हावया लढली मुलगी मुन्नी बर्फी कुटुंब अमुचे समृद्धीने धनधान्याने भरून वाहण्या वाहन घर धन जमीन जुमला…
-
खेळ – KHEL
आत्मा माझा गुरू खरा निश्चय नय हा धरू खरा व्यवहाराची साथ मिळे खेळ जाहला सुरू खरा पुद्गल असती शब्द जरी मंत्र अक्षरी भरू खरा लंबक दोले हळूहळू भाव अंतरी झरू खरा मूर्त सुनेत्रा घडवाया चिरा चिऱ्याने चिरू खरा
-
देऊळ – DEOOL
आत्म्यात काय नाही आत्म्यात सर्व काही सरसाव आज बाही आत्म्यात सर्व काही आहे अभंग अजुनी देऊळ देह मंदिर हृदयात ज्योत राही आत्म्यात सर्व काही तावून ठाकले हे चारित्र्य शुद्ध माझे देण्या स्वतःस ग्वाही आत्म्यात सर्व काही मम मातृभाव प्रीती जगण्यास श्वास पुरवी गर्भात धर्म दाही आत्म्यात सर्व काही ठिणगी उरी सुनेत्रा कर्मांस खाक करण्या अवगत…
-
तुडुंब – TUDUMB
गाता भजन स्तवन उमटे हृदयात बिंब भावाचे गाता नवी गझल भिजले प्रतिबिंब चिंब भावाचे भरुनी नयन टपटप खिरत टिंबात लिंब सळसळता गाता सरोवरी हलले पाणी तुडुंब भावाचे लगावली – गागा/लगा/लगा/गागा/गागाल/गाल/गागागा/ मात्रा – १४/१४/ अक्षरगण वृत्त
-
पत्ता – PATTA
जिनशासन सत सत्ता आहे गिरवायाला कित्ता आहे नको सुपाऱ्या कुटूस चिकन्या कातरण्या अडकित्ता आहे फतरी पान न करी पकडले हा हुकुमाचा पत्ता आहे खलात खलबत जिरवायाला संगमरवरी बत्ता आहे चित्रामध्ये गुरगुरणारा चित्तचोर नव चित्ता आहे दार मागचे खुले सर्वदा बार नव्हे तो गुत्ता आहे पगार महिना हजारात पण शतपट मिळतो भत्ता आहे भावपूर्ण अष्टक जयमाला…
-
मज्जाव – MAJJAV
गाता गझल गीत लिहिले मक्त्यात नाव रक्ताने रक्तपात टळण्या केला पुन्हा मज्जाव रक्ताने पाऊलवाट मळवाया का रचू डाव रक्ताने शब्दांनी भळभळणारे का भरू घाव रक्ताने औषधा मसी ना उरली लेखणी शिशाविन पोकळ भेदले लक्ष्य बाणाने हेरून भाव रक्ताने चटक ना रक्त मासाची पुरविण्या लाड रसनेचे हे हृदय न कत्तलखाना बुडविण्या हाव रक्ताने सळसळते सत्य रक्तात…