-
तिप्प – TIPPA
मन शीतल कर चिंब भिजाया शुष्क भावना तपून अश्रू पिंडी झाल्या रुक्ष भावना दुबळे मन जर होते हळवे वात्सल्याने देत सावली व्यक्त करतसे वृक्ष भावना शुद्ध अशुद्धाची चर्चा बस गडगडणारी धवल घनांना सजल बनवती कृष्ण भावना किती जागुनी गस्त घालशिल स्वतः स्वतःवर नीज सुखाची येण्या पांघर सुस्त भावना गझलेमधला गळेल पारा वृत्त फोडुनी साच्यामध्ये ठोकशील…
-
अत्तर घन – ATTAR GHAN
अधर सहज मिटलेले रेषेवर जुळलेले आघात न कसलाही प्रतिघातच उठलेले पर्णांचे शुष्क थवे वाऱ्यावर उडलेले पानातुन तांबुस दो मौन तुझे हसलेले स्वप्नातच स्वप्न जणू नवल खरे घडलेले क्षितिजावर सांज उभी अत्तर घन झरलेले गा गा गा गुणगुणता उत्तर मज सुचलेले जगण्याची आस नशा जीव जगी रमलेले नीर सुनेत्रात पुन्हा पापण दल हललेले
-
आत्मजा -AATMAJAA
मोरपंखी कुंचला दहिवराने चिंबला कल्पना माझ्या खऱ्या तरल कोमल श्रुंखला गीत कविता गझल धन जीव माझा दंगला साखळी सहजी तुटे मोद भूवर सांडला जपत आले सर्वदा भाव हळवा दंगला पंचभूते नाचता काळ नाही भंगला मी सुनेत्रा आत्मजा देहरूपी बंगला
-
हरी – HAREE
कडवट होता जरी गझल गुरु संवेदनशिल तरी गझल गुरु काय लिहावे शिकवुन गेला साहित्यातिल हरी गझल गुरु मातीमधुनी घडे घडवुनी गेला अपुल्या घरी गझल गुरु गझल पाहुनी कळ्याफुलांची झरे सरीवर सरी गझल गुरु म्हणे मला तो लिही ग मक्ता तूच खरोखर खरी गझल गुरु मौन असूनी खूप बोलका शब्दकोश तो वरी गझल गुरु काय लिहू…
-
स्याद्वाद शैली – SYAADVAAD SHAILEE
जिना बिलोरी लवचिक मजबुत जिना चढूया मजेत मजबुत वळणावरती मंचक झुलता जिना वळतसे गर्कन मजबुत वळणे वळसे घेता घेता जिना बनतसे अजून मजबुत स्याद्वादाची सलील शैली जिना पेलतो डोलत मजबुत टोक गाठुनी न्याहाळत भू जिना थबकतो वळून मजबुत वर्तमान अन भूत संगरी जिना आजपण तसाच मजबुत भविष्य लिहितो स्वतः स्वतःचे जिना म्हणे मी खरेच मजबुत
-
नाजुक तंतू – NAAJUK TANTOO
सालांमध्ये साल पावले वीसएकविस साल मला सरोवरे मी कैक पाहिली पहायचे पण दाल मला सदैव गाठी बसती तुटती नाजुक तंतू ताणून ग हलके हलके सोडव गुंता म्हणते आंतरजाल मला धवलगान वर्णांचा ऐवज मोक्षाचा सोपान खरा दिडदा दिडदा बोल सांडती रंगांनी प्रक्षाल मला जुनाच मुखडा नवा अंतरा म्हणता म्हणता सां सां ध प भूपाळीचे स्वर भक्तीमय…
-
भावबंधन – BHAAV BANDHAN
गालगागा गाल गागा मोज मात्रा गा ल गा गा अंधश्रद्धा सोड मूढा सत्य आत्मा ढाल गागा नाव नाना अर्थ सांगे जो हवा तो घे उशाला साद देई मग पहाटे अंतरीचा ताल गा गा मी ममत्त्वाच्याच मोही म्हण हवे तर भावबंधन गात तुज जगण्यास मोदे शिकविते मी चाल गा गा लहरते रंगीत थंडी देतसे संगीत निर्झर…