Category: Ghazal

  • सवय जादुई – SAVAY JAADUI

    हवा जादुई ..हृदय जादुई. श्वास घ्यायची सवय जादुई. रंगबिरंगी दुनिया माझी.. माझ्याभवती वलय जादुई. खाण गुणांची खोदत बसता.. घिरट्या घाली प्रणय जादुई . निर्भय देतो स्वतः स्वतःला.. मोक्ष मिळविण्या अभय जादुई. मक्त्यामध्ये काय लिहू मी.. दाट सायीसम सय जादुई. काळासंगे शाश्वत मैत्री.. नाव तयाचे समय जादुई.. सदा ‘सुनेत्रा’ तुझियासंगे .. न पुढे न मागे लय…

  • शब्दमेळ – SHABD-MEL

    शब्दखेळ मी रोज मांडते नवाजुना शब्दमेळ अन ओज सांडते नवाजुना नित्य डोलते भार पेलण्या जगावया शब्दकेळ ना बोज कांडते नवाजुना

  • डेपो टिंबर – DEPO TIMBAR (DEPOT TIMBER)

    कवितेसाठी कारण मजला सकाळ सुंदर आहे गझलेसाठी सुंदर कारण मनात मंदिर आहे काव्यसंपदा माझी मजला निळसर अंबर आहे किणकिणणारे घरात माझ्या झुलते झुंबर आहे एक जादुई माझ्यापाशी वजनी कंकर आहे गझलियतीचा त्यात टाकला मी रे मंतर आहे खेळायाला उड्या मारुनी डेपो टिंबर आहे पटांगणावर बूच फुलांनी सजला डंपर आहे गझलेमध्ये मक्ता लिहिणे हा नच संगर…

  • पूर्वभव – PURVABHAV

    थबकुनी अंदाज घेतो शेर माझा आगळ्या डौलात येतो शेर माझा भावनांचे मेघ तपुनी थंड होता अंतरी चाहूल देतो शेर माझा पाहता मुनीराज ध्यानी मौन विपिनी बैसतो त्यांच्यापुढे तो शेर माझा कैकवेळा खोडुनी मी परत लिहिता पूर्वभव कुठला स्मरे तो शेर माझा जाग येता मज पहाटे शांत समयी शिखरजी यात्रेस नेतो शेर माझा

  • आत्महित – ATMAHIT

    काळांना मी तिन्ही वापरे माझ्या आत्म्याचे हित करण्या लेखणीस मी सतत चालवे माझ्या आत्म्याचे हित करण्या आत्महिताला जो जाणे तो सहजच परहित करतो रे नी सा ग प म ध सारे माझ्या आत्म्याचे हित करण्या

  • गोडवा – GODVAA

    मी मौनाशी मैत्री केली मौनातच मम आरोळी शब्दांसंगे खेळ कागदी भरते कर्मांची झोळी अधरांवर तर्जनी न नाचे साक्षीभावे अचल उभी मकरंदी गोडवा गुळाचा निर्जरेस नव चारोळी

  • मधुरस – MADHURAS

    मुग्ध मधुरस माय मराठीचा मज मिळतो मुग्ध मधुमित माता मम्मीचा मज मिळतो मोरणी मी मित्रत्वाची मान मनोरम मुग्ध मालन माल मोजता मसि मध मिळतो