Category: Ghazal

  • आनन – AANAN

    अभ्यासाचे साधन पुस्तक ज्ञान मिळविण्या कारण पुस्तक स्वाध्यायास्तव विनम्र भावे करते हाती धारण पुस्तक दो घटकेच्या मौजेखातर नकोस ठेवू तारण पुस्तक जीव ओतुनी लिहिल्यावरती आत्मसुगंधी कानन पुस्तक बिंब दाविते ज्याचे त्याला तुझे सुनेत्रा आनन पुस्तक

  • सिद्धता – SIDHHATAA

    मी न कुठली पाठ करते सिद्धता सोडवीते पायरीने सिद्धता पायऱ्यांना गाळले तेव्हांच रे जाणल्यावर पूर्ण आहे सिद्धता सिद्ध जेव्हा मी स्वतःला करितसे यत्न सारे करुन मांडे सिद्धता ओळखूनी क्षेत्र हितकर मम जिवा झरत जाते सहज येथे सिद्धता मी सुनेत्रा नित्य माझी साधना पक्ष साध्यातून साधे सिद्धता

  • गरे वाटण्या – GARE VAATANYAA

    विसरुन जा ते असे कुणाला म्हटले तरिही आयुष्याशी बोलू द्यावे .. बरे वाटण्या फणस खोबरी वर काटेरी सोलायाला मदत विळ्याला करण्यासाठी .. गरे वाटण्या बरे वाटता गरे वाटता झरे वाहती हृदयामधले ऊर मोकळा .. होतो नकळत अंतरातुनी उमलुन येतो अभिनय उपजत खऱ्यांपुढे पण खरे वागणे .. खरे वाटण्या

  • कुरल -KURAL

    गझलेसाठी गझल हवी .. सृष्टीसम ती कुशल हवी … वरवर वाटे कुरल जरी .. अंतरातुनी सरल हवी… जरी दाटते गच्च मणी .. झरताना पण तरल हवी … नको कोरडी ठक्क बरे .. जलदासम ती सजल हवी … गझल सराईत गझल नवी .. नित्य वाटण्या नवल हवी …

  • अनस – ANAS

    अनस अक्षरात अन सह्यांत .. हृदय स्पष्ट स्वच्छ ह्यांत … गाळ गाल वा लगाल .. दीर्घ र्हस्व काय ह्यांत … ही लगावली लिहून .. ठेव पुस्तके वह्यांत … ह्यांत हा रदीफ जाण .. काफिया अनसच ह्यांत … अनस केव स्वच्छ काय .. काफिया स्वर बघ ह्यांत … पात्र माझिया मनात .. डोकवे कली न ह्यांत…

  • राही – RAAHEE

    सोडून सर्व देते धरले कधी न काही गझलेस रंग देण्या मी माझियात पाही वाटा अनेक होत्या काहीच मी निवडल्या जगणे मजेत होते झाले कधी न त्राही माझेच गीत मजला पण वाटते न माझे देण्यास मोद सर्वां म्हटले कधी न नाही गोष्टीत शील कोणा मन कल्पनाच वाटे गोष्टीवरून कोणी शोधेल मूळ राही गझलेस पूर्ण करण्या साकी…

  • डाकिया – DAAKIYAA

    फुका कधी ना वाढविते मी भाव माझिया भावाचा अर्थपूर्ण मम गझल उमलते होत काफिया भावाचा लयीत येती शब्द नाचरे रदीफ होण्या गझलेचा परिमल पसरव गझल फुलांतिल तूच वारिया भावाचा कर्माष्टक जाळून तपाने हिशेब चुकता करुन पुरा देवगुणांच्या टोळीमधला मुक्त डाकिया भावाचा आंतरजाली फिरता रमता कर्मास्रव झाल्यावरती अंतरातही जाळे विणतो सुबक कोळिया भावाचा देहमंदिरी आत्मा माझा…