Category: Ghazal

  • सोम – SOM (MOON)

    सोम सुंदर वार आहे सोम शंकर वार आहे कोण म्हणते सोम मदिरा सोम संगर वार आहे गालगागा दोन वेळा सोम मंतर वार आहे चंद्रमा अन सिद्ध शीला सोम अंबर वार आहे वार मोजाया खड्यांनी सोम कंकर वार आहे अंधश्रद्धा सोड मनुजा सोम अंतर वार आहे मी सुनेत्रा जाणते हे सोम मंदिर वार आहे

  • अंचल – ANCHAL (SAREE PLY)

    मंगल मंगल मंगळवार मंगल चंचल मंगळवार अंबर अंतर लालेलाल मंगल दंगल मंगळवार सुंदर नीरज तालेवार मंगल जंगल मंगळवार अंगण कुंतल गारेगार मंगल अंचल मंगळवार पीठ सुनेत्रा दाणेदार मंगल संबल मंगळवार

  • भूल – BHUL(LAPSE)

    मन कधी पारवा रे कळ गूढ गार वारे घन भूल भुलाबाई मन राग मारवा रे वन गर्द सावलीचे मन नवा कारवा रे तन बर्फ गोठलेले मन तसे ठार वारे हातभर भुई माझी मन म्हणे सारवा रे

  • जिनस्तुती – JIN STUTI (PRAISE OF JIN)

    शुक्रवार शुक्रवार शुक्रवार गा शुक्र धार वीर नार गाल गाल गा आज दिवस शुक्रवार काल कोणता शुक्रवार च्या प्रथम गुरूर वार गा शुक्रवार नंतर दिन सांग कोठला वासर शनि हाच ठाम करत कार्य गा राध शुद्ध अर्थ बोल आत्म देव रे रवि नि सोम निकट वार ताल धरत गा काफिया स्वर मधुर मम तरल भावना…

  • झंझावात – ZANZAVAT (STORM)

    भाव उसन्या भूमिकेचे लोचनी पाळू नको कागदी जर वेदना तव कुंतली माळू नको कवळ झंझावात जलदा गिरिमुखावर वर्षण्या शब्द प्रक्षाळून घे पण भाव प्रक्षाळू नको परसदारी फुलव कर्दळ केळ कोर्फड मोगरा सांडपाण्यावर घराच्या गझल खंगाळू नको गोवऱ्या वा शेणकूटे शब्द कुठलाही असो शेण थापूनी करांनी घामबिम गाळू नको मी “सुनेत्रा” सहज सुंदर गात मक्ता गुंफते…

  • ओंडका – ONDAKA (LOG)

    झोपावया सुखाने लाटांस अंथरू आहेच ओंडका मी नाहीच पाखरू गागालगा लगागा गागालगा लगा आहे लगावली तिजलाच वापरू मात्रा इथे किती ते मोजून सांगते बावीस त्या बरोबर त्यांनाच सावरू शेरात या कशाला मम नाव मी लिहू हा शेर टोचरा जर आहेच गोखरू जलदापरी सुनेत्रा ओतून घागरी अर्थास सार्थ करण्या देहास मंतरू

  • शुक्र – SHUKRA (VESPER STAR )

    धीर वीर शुक्र वार धीर धीर शुक्र वार वीर्य वंत धैर्य वंत धीर मीर शुक्रवार शौर्य दाखवाच आज धीर तीर शुक्र वार वेड तारणार काय धीर पीर शुक्र वार वेगवान मी प्रवाह धीर नीर शुक्र वार