Category: Ghazal

  • पिको – PIKO (ALLOW ELEVATION)

    मम ध्यान णमो अरिहंतअंतरी वसो अरिहंत चैतन्य भक्ती विभोरनारना नमो अरिहंत गालगा यमाचा गातहृदयात ठसो अरिहंत मी म्हणे गझल माझीचजीवास जपो अरिहंत आत्मधर्म सत आधारसिद्धांस स्मरो अरिहंत मोजुनी रंग मापातगाळता कळों अरिहंत गा लगावली गागालसगुण झळझळो अरिहंत मज नाव हवे मक्त्यातडोळ्यात भरो अरिहंत रक्ष का म्हणू कोणाससिद्ध सो भजो अरिहंत घालून दहा टाक्यांससुकवून पिको अरिहंत…

  • परमेष्ठि – PARMESHTHI (SUPREME)

    व्हॉटसॅपचे डोके आणिक, फेसबुकची काठी..क्षमा मार्दवाची मम हाती, एक कलमी लाठी. धरा हवा अन जलधारा, दहा दिशा गातातदशलक्षण धर्माचे नाणे, खणखणतेय गाठी. आर्जव शुचिता सत्य संयमे,अहितकर त्यागाया..अकिंचन्य अन ब्रह्मचर्य ही,असूदे परिपाठी. क्षमावणीला पर्व समाप्ती,त्यागु शंका-शंका..धर्म अहिंसक मर्म जाणतो,वर्म बुद्धी नाठी.. फेसबुकची तोलाया विटी,व्हॉटसपचा दांडू..पर्यूषण पर्वातिल लोपी, पूज्य माझिया पाठी.. ईश्वर अल्ला सिद्ध जिनेश्वर,अणु रेणु परमाणुत..फिरे…

  • मंत्र णमो – MANTRA NAMO (SACRED BOWING)

    पावसात न्हात गात चिंब चिम्ब भिजणारचओलेत्या वस्त्रांना हलके मी पिळणारच वाऱ्यावर स्वार होत आभाळी फिरणारचक्षमा मार्दवात धर्म आर्जवास मिळणारच धो धो धो धबधब्यात शुचिता मम हसणारचटपटपत्या वसनांतुन नीर क्षीर झरणारच सत्याला भिजवाया पळापळी करणारचएक मूळ खोड जुने कर्माने जळणारच खाक होत राख होत पाण्याला मिळणारचउपजत मम संयम बघ उन्हामधे तपणारच कृष्णमेघ हळूहळू झेप घेत उडणारचत्यागुनिया…

  • चिती – CHITEE (PRISM)

    धांगडधिंगा किती पावसा सांग असाका अती पावसा वेड तुला का असे लागले फिरलीका तव मती पावसा झाड वडाचे तुझ्या काननी पाव म्हणे तुज सती पावसा धार खरी कापण्या भिजवण्या घे पवनासम गती पावसा घनफळ बिनफळ तुझे मोजण्या कुठली आणू चिती पावसा

  • व्यर्थ नाही – VYARTH NAAHEE (NOT IN VAIN)

    पत्थराला शेंदराने लिंपणे सोड आता देव असले पूजणे व्यर्थ नाही क्षीर नागा पाजणे कारल्याला पाक घालुन मुरवणे नाद केव्हा सोडशिल तू सांग हा चढत जात्या पावलांना ओढणे घालता गुंफून माळा तू गळा वाटते ना ते मला मग लोढणे धावती मागून माझ्या काफिये फार झाले शर्यतीतून धावणे तिंबली ऐसी कणिक मी चेचुनी शस्त्र माझे सज्ज बघ…

  • इलाज – ILAAJ (MEDICATION)

    वाळलेली शुष्क पाने लटकलेली कोवळी प्रासुक उन्हाने बहरलेली झिंगलेली गझल साकी बघ सुनेत्रा आम्रतरुवर गात गाणे झोपलेली … मयुरपिसारा हरिणी पाडस धवल लाल पुष्पांची पखरण हिरवाईने सलज्ज काया मात्रा माझ्या इलाज औषध … जर्द लाल जर्बेरा आणिक धवल पीत कुसुमांची वर्दळ हिरवाईचे वसन लपेटुन ऐके पानांची मी सळसळ अक्षर ओळी पाठवलेल्या पत्रामधुनी आठवतिल ग सई…

  • आरक्त – AARAKT (CRIMSON)

    लोक हे दिसले न पूर्ण विरक्त मजला वाटले काही तरी पण सक्त मजला प्राशुनी माधुर्य गझले पश्चिमेसम सांजसमयी व्हायचे आरक्त मजला जोगवा मागे न पाळे मी तिथीही का तरी म्हणतात कोणी भक्त मजला आवडे मज मम मुठीतुन विश्व बघणे मौन म्हणते राहुदे अव्यक्त मजला ही बरी की ती सुनेत्रा काय सांगू जी खरी ती भावते…