-
उदकाडी – UD KAADEE
प्राक्तन माझे गुलाम बनले मम आत्म्याच्या चरणी झुकले शून्य जाहल्या पंचभुतांना भविष्य माझे पुरून उरले उधाणलेल्या समुद्रात मन नाजुक उदकाडीवर तरले झरलेले मम अक्षर अक्षर शुभ्र कर्पुरासमान जळले लेखणीस मम वंदन करण्या कर जोडुन मी डोळे मिटले
-
सम्यक श्रद्धा -SAMYAK SHRADDHA
सम्यक श्रद्धेवर मी जगते सृष्टी माझी जिवंत आहे जगावयाची जगवायाची माझी भाषा ज्वलंत आहे म्हणोत कोणी काही मजला लिहीत राहिन सुरेल गाणी गाण्यांमधल्या बकुळ फुलांचा परिमल कीर्ती दिगंत आहे उंच कड्याच्या टोकावरुनी निळ्या नभाला बांधिन झूला सभोवताली पहावयाला मला कुठे रे उसंत आहे दोन पावलांपुरती भूमी बघून रोवे पाय अता मी पंख पसरुनी झेप घ्यावया…
-
गोरज -GORAJ
कलंक नाही डाग न कसला हे तर हळदी कुंकू घन वर अभ्रांच्या गर्दीत अंबरी खग ताऱ्यांचे नाजुक झुंबर गुरे वासरे वाटेवरती गळ्यात मंजुळ घंटा किणकिण सांजेच्या केशरी करातिल झळाळणारे कंकण बिलवर पुष्पपऱ्यांचे रूप घेउनी सारवलेल्या अंगणातुनी निळ्या जांभळ्या बाळ पाहुण्या भूचंपा डोलती भुईवर हवेत गोरज लाल सावळा वडावरी पक्ष्यांचा कलरव शेणसड्यावर रांगोळीतुन गुलबक्षीची फुले तरूवर…
-
बरकत – BARKAT
लुटेन संक्रांतीस गोडवा घरास माझ्या बरकत आहे हृदयसागराच्या धक्क्यावर सुख शांतीचे गलबत आहे मधुमेहाची कशास चिंता शरीर हलते चपळाईने वाळ्याचे माठात सुगंधी जांभुळ रसना सरबत आहे तिळातिळाने दिवस वाढुनी तिळातिळाने रात्र घटाया मावळतीचा सूर्य केशरी दिशेस उत्तर सरकत आहे कशास कोंडुन स्वतःस घेशी दगडी भिंतींआड पाखरा उघड उघड रे द्वार चंदनी दक्षिण वारा धडकत आहे…
-
ट्राम – TRAAM
ऊन सावली हिरवाळीवर लोळत आहे रम्य हवेलीच्या छपरावर नाचत आहे वळणा वळणाच्या वाटेवर वळसे घेण्या झुकझुकणारी ट्राम विजेवर धावत आहे वृक्ष तरूंच्या पानांवरती झाक पोपटी तिथे तरुतळी मुग्ध बालिका खेळत आहे मधुर सुवासिक दरवळणारा आंबेमोहर आंबेराई कंच पाचुसम डोलत आहे धूत धवल पाकळ्या जुईच्या त्यावर मोहक कुशल सुनेत्रा कशिदा नाजुक रेखत आहे
-
गॅलरी – GALAREE(GALLERY)
काल मी लिहिलेच नाही वासरीत काही विसरले करण्यास नोंदी डायरीत काही पसरले कडधान्य देण्या ऊन छान वारा पाखरे आलीत टिपण्या ओसरीत काही कोसळे पाऊस धो धो अंगणात दोरी घातले सुकण्यास कपडे गॅलरीत काही आज मी गाऊन भरते ओंजळीत गाणे शोधुनी हुंकार अडले पावरीत काही माझिया ओठात येता बहर गालगागा कागदावर उतर गझले सावरीत काही
-
चूर्ण – CHOORN
ग़ज़लेवरती गझल लिहाया गझल पुन्हा झाले गझलेला मम दाद द्यावया तरल पुन्हा झाले विडंबनाची व्याख्या शोधुन विडंबने लिहिली विडंबनासम वक्र होउनी सरल पुन्हा झाले परिमल खोडुन परिमळ लिहिले मागे मी गेले काफियास टाळाया सवती कमल पुन्हा झाले कवितांच्या मी गझला केल्या गझलांच्या कविता काव्य त्यातले जपण्यासाठी सजल पुन्हा झाले स्वतःस वाटुन मी पाट्यावर चूर्ण मऊ…