Category: Ghazal

  • गोमंतक – GOMANTAK

    गोमंतक भू वरचा सुंदर स्वर्ग जणू आहे गोमंतक सृष्टीदेवीचा वर्ण जणू आहे काव्य झराया सदैव अनुकूल निसर्ग गोव्याचा गोमंतक काव्याचा आशय गर्भ जणू आहे अक्षरपंखी पुष्पपऱ्यांच्या सुगंध यात्रेची गोमंतक निर्मिती जादुई अर्थ जणू आहे अतिथी देवासमान मानुन तृप्त त्यांस करणे गोमंतक देशाचा हा तर धर्म जणू आहे सोनेरी भूमीत दिव्य या वनमंदिर शोभें गोमंतक आगम…

  • मंगल(मङ्गल) – MANGAL

    मंगल मन्गल मङ्गल चरणी शुद्ध निरञ्जन दीप तेवतो मुनी दिगंबर निर्भय ज्ञानी जितेंद्रिय आत्म्यात राहतो अभय मिळाया जीवांना हा काळ खरा पावन आला हो पानगळीचा ऋतू शिशिर हा मुक्तक लिहिण्या मला भावतो मुक्तक – मात्रावृत्त (३२ मात्रा)

  • रसोई – RASOEE (RASOI)

    घरास माझ्या खिडक्या दारे आत वाहते वसंत वारे प्रभात समयी पक्ष्यांसंगे मन म्हणते मज गा रे गा रे बागेमधली फुले पाहुनी काव्य बरसते दरवळणारे अन्न शिजविते रसोईत मी शुद्ध चवीचे आवडणारे अंगणात गप्पांची मैफल सोबतीस मम प्रियजन सारे जिवलग प्रेमाचे शेजारी जणू हासरे भवती तारे घरात तुजला नाही थारा जा दुःखा तू जा रे जा…

  • जिनमंदिर – JIN MANDIR

    परिसर सुंदर नयनमनोहर तेथे मनभावन जिनमंदिर रम्य वाट मज तिथे नेतसे खाली भूमी वरती अंबर वाजविता हाताने घंटा मंजुळ घुमतो नाद शुभंकर गर्भगृही स्थापित जिनप्रतिमा दर्शन घेता पावन अंतर प्रसन्न होता मम मनमंदिर वाट घरी मज नेई झरझर गझल मात्रावृत्त (मात्रा १६)

  • आसन – AASAN

    धडधडते काळीज थांबता तुझ्यासवे मी घेतो श्वास तव देहाचा झालो परिमल अता राहिलो ना मी भास टकटक होता द्वारावरती मीच उघडले हसून दार म्हणालीस तू सत्वर या या आत पातले अतिथी खास पाणिदार मोत्यांचे आसन अतिथी वदता आम्हा हवे अंगठीतले मौक्तिक पाणी सांडुन भूवर झाली रास दिव्यध्वनी तीर्थंकर वाणी सर्वांगातुन खिरता गान गणधर आत्मा झुकून…

  • मिसरे – MISARE

    ऐकायाला बोलायाला तुझ्यासवे मी आहे आज पूर्ण भराया अर्धा प्याला तुझ्यासवे मी आहे आज विसरुनी जा सारी व्यवधाने लिही सोडुनी मुक्त मनास लेखणीतुनी सांडायाला तुझ्यासवे मी आहे आज कागदावरीसळसळताना नागिण काळी होशिल ना ग कात पुराणी टाकायाला तुझ्यासवे मी आहे आज गझलीयत अन काफियातिल अलामतीला ठेव जपून गझल भावघन फुलवायाला तुझ्यासवे मी आहे आज पुन्हा…

  • गडगंज – GAD-GANJ

    सोडुन दे ना मित्रा काही शब्द बोचरे भोचक आता वर्तमानिच्या वाऱ्यासंगे लयीत झुळझुळ मोहक आता जे जे सुंदर तुझेच ते ते असे जाण तू स्वतः स्वतःला जाणलेस तर तुझ्याप्रमाणे नसेल सुंदर साधक आता नशेमधे तू तव गझलेच्या राहशील जर त्यागुन मीपण घडेल तुझियासंगे सुद्धा चर्चा साधक-बाधक आता चल जाऊया गझलेसंगे रम्य जगी या फिरावयाला चित्त…