Category: Ghazal

  • विसावा – VISAAVAA (REST)

    डोंगराच्या पायथ्याशी घे विसावा पावसा तृप्त जल प्राशून पृथ्वी ठेव पावा पावसा तिज समुद्रा भेटण्याची ओढ होती लागली भेटली ती काय द्यावा तुज पुरावा पावसा माणसांच्या कुंडलीतिल कर्मरूपी पिंजरा पत्रिका मांडे स्वतः जो मुक्त रावा पावसा वासनांची लाट अडवुन संयमाने तापता चिंब भिजल्या मृत्तिकेचा रंग ल्यावा पावसा केस सुकवी मेघमाला लोळणारे भूवरी तूच आता ऊन…

  • टिकाव – TIKAAV (PICKAXE)

    मम आत्म्यावर माझी प्रीती स्वभाव माझा नेणिवेतले आठवण्या ना सराव माझा मनापासुनी जे जे शिकले आठवेल मज सुयोग्य समयी सहज व्हावया उठाव माझा दिशादिशातुन वादळ येता पार व्हावया मला कधीही नडला नाही विभाव माझा कुटी हवेली शेत बंगला याहुन जिवलग काया माझी या जन्मातिल पडाव माझा मी न मांडला मी न मोडला फक्त पाहिला तुझियासाठी…

  • नागमोडी – NAAGMODEE (ZIGZAG)

    पहाटे पहाटे मला गझल भेटे पहाटेस वेडे खरे नवल भेटे निसर्गास गाणे नवे ऐकवाया पहाटे खगाला धरा सजल भेटे दवाने भिजूनी सुगंधात खिरता पहाटे गुलाबी हवा तरल भेटे ऋतू पावसाळी गडद गडद न्यारा पहाटे निळ्याशा जळी कमल भेटे नशीली तराई निशा नागमोडी पहाटे पुन्हा पण वळण सरल भेटे

  • जनित्रे – JANITRE (GENERATORS)

    कुठेतरी भुंकतेच कुत्रे वादळात उडतातच पत्रे चित्रकार नसतातच भित्रे हवी तशी रेखतात चित्रे एक असे जे ते तर संत्रे बहुवचनी संत्री अन छत्रे पुत्राचे बहुवचन न पुत्रे तसेच मंत्राचे ना मंत्रे एका दिवशी अनेक सत्रे आडनाव आठवले अत्रे गरगर फिरती कैक जनित्रे वहीत माझ्या त्यांची चित्रे मक्ता लिहिते खास सुनेत्रा गुंफाया शेरांची सुत्रे

  • चषक – CHASHAK (GOBLET)

    जाणिवेचे नेणिवेशी पटत गेले मैत्र माझे अंतराशी जुळत गेले भूतकाळाला न पुसले जागले मी वर्तमानी मम भविष्या रचत गेले काष्ठकाट्यांचाच मंचक घनतमासम झुलत त्यावर ग्रह नभीचे टिपत गेले लाकडाला हृदय नसते पण तरीही करुन त्याची स्वच्छ पाटी झरत गेले वासनांच्या वादळांना थोपवीण्या वादळांशी लेखणीने लढत गेले भावनांचे अर्घ्य वाहुन तुज निसर्गा गात गाणे नित्य मोदे…

  • कोरोना – KORONAA (CORONA)

    सांग कशाला बोलायाचे येता जाता कोरोनावर अंतर राखुन हवे तेवढे अक्षरातुनी भिजवु अंतर स्वच्छ हात अन स्वच्छ लेखणी गाळत जाता भरभर शाई टपटप मोती उधळत जाई मेघसावळे निळसर अंबर

  • दुवा – DUVAA (LINK)

    क्षमेने हृदय शांत होते खरे रे खरे देव शास्त्र नि गुरू हे खरे रे भिजुन मार्दवाच्या दवाने फुलाया कळ्यांनी उठावे पहाटे खरे रे पहाडाप्रमाणे खडी कृष्ण काया झरे अंतरी आर्जवाचे खरे रे जुना शब्द शुचिता नव्याने लिहूनी धडे स्वच्छतेचे स्मरावे खरे रे कळे सत्य जेव्हा मिटे भ्रांत सारी तरी संयमाने जगावे खरे रे अकिंचन्य तप…