-
नर्तिके – NARTIKE
नाच आज खास मस्त रात्र नर्तिके धुंद फुंद जाहलेत गात्र नर्तिके नर्तनात तांडवी जपून नाच तू पातलेत सान मौन छात्र नर्तिके बाण सोडतेस कैक दांडियातुनी भासतेस तेजरूप क्षात्र नर्तिके नाचतात लक्ष लक्ष नर्तिका जरी भावतेस तूच एक मात्र नर्तिके कृष्ण श्याम नील वर्ण मेघ वर्षती सांडते भरून पूर्ण पात्र नर्तिके गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २०)…
-
सोनतुला – SON-TULAA
धुतल्या तांदूळासम येथे सापडलेका कोण तुला पुरे जाहले अता तोलणे तुला सांगते जोडतुला स्वर्णतुलेची वजने मापे गझलेमधले शिरोमणी त्यांचे प्याले सांडायाची का वाटे रे ओढ तुला डोळ्यावरती बांधुन पट्टी न्यायदेवता उभी इथे न्यायाधिश तू न्याय खरा दे शोभत नाही मौन तुला स्वार्थासाठी कोणी अपुल्या बळी देतसे जीवाचा शरीर पुद्गल सिद्ध कराया दुभंगेल ही सोनतुला नजर…
-
जिवंत वेडा – JIVANT VEDAA
तरही गझल गझलेची पहिली ओळ, कवी गंगाधर मुटे यांच्या “स्वदेशीचे ढोंगधतुरे” या कवितेची…. एक आणखी झाडावरती लटकून मेला काल दुसरा कोणी रेलखाली तडफडून मेला काल जिवंत वेडा सुंदर जगला मस्तीत नाचत गात नातीगोती माया प्रीती झटकून मेला काल सदासर्वदा सिग्नल तोडे बाईकवरचा स्वार पुलाखालच्या हातगाडीस धडकून मेला काल पाऊस असा धो धो पडला रस्त्यावरती खड्डे…
-
तत्त्वे – TATTVE
निळ्या कागदी श्यामल गझला संगणकात ठेव अथवा गाडुन त्यांस कुंडीत मातित हात ठेव जीव अजीव आस्रव संवर बंध निर्जरा मोक्ष जैन दर्शनातील तत्त्वे ध्यानात सात ठेव आवडत नसेल वाचन तर लक्ष देऊन ऐक ह्या कानाने ऐकत ऐकत त्या कानात ठेव देहबोली नेत्रबोली अनेक बोली शिकून बोलणं पाहणं ऐकणं चालणं तुझं झोकात ठेव बोल कौतुके काट्यांसंगे…
-
जुडगा – JUDAGAA
मोक्षाच्या द्वारावर टाळे कैक लागले होते अनेक जुडग्यांच्या भाराने छल्ले झुकले होते एकच टाळा खरा शोधला मी तर्काने माझ्या एकच छल्ला उरला हाती बाकी पडले होते हातांमध्ये घट्ट पकडला किणकिणणारा छल्ला छल्ल्यावर किल्ल्यांचे जुडगे मस्त लटकले होते सोन्याच्या किल्ल्यांचा जुडगा मी नजरेने टिपला रत्नत्रय पारखी नेत्र मम् त्यावर खिळले होते ओंकारातिल पाच अक्षरे पंचपरमपद रूपी…
-
घुबडे – GHUBADE (OWLS)
कोंदटलेले धुके वितळले नभ जलदांनी भरले अवचित हॅरी पॉटरचेच जादुई कुंभ नभी गडगडले अवचित डिमेंटॉर्सच्या कृष्णकलांनी झाकोळुन आत्मे घुसमटता आश्रयदाते आकाशातिल मरुतातुन अवतरले अवचित छडी फिरवुनी “पड पड धो धो” मंत्र जपतसे वीज नाचरी मंतरलेल्या मग मेघातुन मौक्तिक जल टपटपले अवचित सुसाट चक्रीवादळ गरगर ढगांस फिरवुन धडका देता आभाळाचे टपोर श्यामल नयन कैक झरझरले अवचित…
-
ब्लॅक – BLACK
कचेरीत फ्लिटविकच्या होता कैद सिरिअस ब्लॅक कृष्णकला वर्गात कोंदटे रंग कळकट ब्लॅक हिप्पोग्रिफवर बसून झाला मुक्त काळ कुत्रा परतुन हॅरी गिळे मृदु चॉकलेट कडवट ब्लॅक चंदेरी काळवीट उमदा नाम प्रॉन्ग्ज त्याचे खरा धाडसी आश्रयदाता रात्र अनवट ब्लॅक हर्माइनी नि हॅरीची ही करामत जादुई निरोप घेई आनंदाने हात हलवुन ब्लॅक घटिका गोलावरती घुमवुन काळाला मागे तृप्त…