Category: Marathi geet

  • कर्तव्य – KARTVYA

    राजाचे कर्तव्यच लढणे पण भाटाचे गात राहणे पीत गुलाबी पाच पाकळ्या जलबिंदूंनी सजल्या भिजल्या उभी पाठीशी हिरवी पाने कळ्या किरमिजी भिजले गाणे भिजता गाणे वारा अवखळ वाहू लागतो झुळझुळ सळसळ सुगंध भिजला वाहून नेतो प्रीत फुलांची पेरून येतो

  • नोंदणी – NONDANI

    विसरतेस जेव्हा कधी ओढणी तू रुमालास करतेस जल गाळणी तू पुरे जाहल्या चौकशा पोलिसी रे तपासून घ्यावी प्रुफे नोंदणी तू जुन्या पुस्तकांना पुन्हा चाळ थोडे कळायास संदर्भ झटक मांडणी तू घरातील खोल्या कवाडे किती ते जरा लक्ष घालून खडा हो झणी तू सुनेत्रा तुझे दोष गुण ओळखूनी स्वतः हो स्वतःची खरी चाळणी तू

  • निहार – NIHAR

    शिशिर ऋतूतील पहाट भासे हवा मुखातील निहार भासे चार चरण यूत चारोळी वा स्वर काफियातिल मुक्तक भासे डावी असूदे अथवा उजवी सात बाराचे शिवार भासे कृष्णा माझी दुहिता मंडीत मूर्त मनातील सुकण्ण भासे नूरजहां मी अनुजा सुनेत्रा तिप्प तनूतील नहार भासे

  • छल्ले – CHHALLE

    मोरपिशी शालूवरी .. छल्ले चांद पंखी ….. पदरा निळे गोंडे गडद .. निळी वेलबुट्टी ….. काठ निऱ्यांचा ग घोळ .. पावलात लोळे ….. जास्वंदीचे पुष्प पर्ण.. चाफ्यासंग डोले….. मोतिमाळ बोरमाळ .. तीन पदर सरी ….. कवडी माळ काळी पोत .. गळेसर लडी ….. चाफेकळी नाक भाळी .. हळदी कुंकू टिळा ….. अधर बंद पाकळ्यात ..…

  • वलयांकित – VALAYANKIT

    काठ पोपटी पिवळी माया भारी जास्वंदीची त्रयी जपे कळ न्यारी हरित दलावर मणी जणू दवबिंदू बिंदू बिंदू समुद्र सागर सिंधू लाल किरमिजी मृदुल पाकळ्या वलयांकित नव कंच सावळ्या शुभ्र चारुता टपटप पानांवरी पौषामध्ये झरण्या श्रावण सरी

  • स्तूप – STOOP

    टिकटिकणारे घड्याळ काटे चिदानंद चिद्रूप शांत जिनालय मूर्त अंतरी मंदिर स्थानक स्तूप शिवार वावर रान शेत अन जमीन गझलांकीत पाखडती घन शब्द अक्षरे हस्तामधले सूप रुजण्यासाठी उपादान अन निमित्त जुळता योग तडाग तीरी धोंडयावरती आत्मा बीजस्वरूप कैद भावना भ्रमर मनातिल मिटूनी नयन दले कैक काफिये गोळा झाले फार रगड वा खूप साय दही घुसळून सुनेत्रा…

  • रंगमाया – RANG MAYA

    निळे सावळे नभ मळलेले क्षितिजावर हे झुकलेले धवल जांभळ्या रानफुलांच्या शिवारात मन फुललेले पीत पाकळ्या हरित पल्लवी चरण धरेवर जणू पडले रंगांच्या मायेत गुरफटले