Category: Marathi geet

  • खट्याळ पोर – KHATYAL POR (NAUGHTY GIRL)

    खट्याळ अवखळ पोर बागडे घरात अवती भवती … पक्ष्यांच्या पंखांवर बसुनी उडते अवती भवती… मजेमजेचे खेळ बेरकी मुग्ध निरागस भाव … वृक्षांच्या राईत तिचा हा निसर्ग सुंदर गाव… गुणगुणते ती मनात रचते अर्थपूर्ण गाणे … वाऱ्यावरुनी वाहत येती तालांकित तराणे … सान गोडुली नात गोमटी खोड्या किती करते .. स्वतः स्वतःच्या रचून गोष्टी आम्हाला सांगते…

  • पाऊस गाणे – PAAUS GANE (SONG OF RAIN)

    निळ्या सावळ्या तळ्याच्या काठी पाऊस बघत उभे रहावे झरझरणाऱ्या धारांसंगे पाऊस गाणे गात रहावे कृष्ण धवल बदकांचे ढंग डोळे भरून पहात काठावरच्या वटवृक्षांचा चिंब कचभार उदवून द्यावा पिवळ्या फुलांच्या झुडुपामागे वाघोबाचा भास व्हावा असा पाऊस असे तळे स्मरणामध्ये साठवून घ्यावे कागदावरती चित्र रेखून त्यात सुंदर रंग भरावे

  • शुद्ध भावे – SHUDDH BHAVE(WITH PURE MIND)

    विठू माऊलीचा लळा तुळशीची माळ गळा .. रखुमाई जाणतिया अंतरीच्या भक्ता कळा.. मन गुलाबी पाकळ्या गुलाबाचा गंध जळा… पाकळ्यांत भिजलेला पाकळ्यांत भिजलेला… . टपटप ओघळती थेंब काठी घळाघळा… एक एक मणीजसा स्फटिकाच्या माळेतला… पाकळीच्या काठावरी थेम्ब मणी गोळा झाला … चातुर्याने ठिबकला जलतरंगात आला… शुद्ध भावे वलयात जाई किनाऱ्यास गात … … .

  • लळा – LALHA (AFFECTION)

    विठू माऊलीचा लळा दाटुनिया येई गळा रखुमाई सांगतीया जाण गळवटी कळा बोल माणसा तू आता पुरे झाला कळवळा अन्यायाच्या तोंडापुढे फोड कोंडाळ्याच्या नळा उपेक्षित कलावंत गाठ त्यांच्या मन तळा किती अश्रू साठलेले वाहूदेत घळाघळा पदराने नका पुसू वाळूदेत झळझळा.

  • दंगा – DANGA( HUBBUB)

    जाग सख्या पांडुरंगा झुंजूमुंजू झालं सोनियाच्या रथातून सूर्यदेव आलं पूर्वदिशी केशरात जगन्नाथ न्हालं … चैतन्याच्या पावसात देऊळात धावा पंढरीचा विठुराया भेटायला यावा थवा पाखरांचा उडत वाळवंटी आला … प्रभातीच्या किरणात स्नानासाठी आला…. पंढरीची चंद्रभागा भीमा आधी नाव धुते पाखरांचे पंख पुसे गाव भाव दर्शनास माऊलीच्या रखुमाई आतुरली….. धूत पंख लेऊनीया मंदिरी पातली.. मंदिराच्या कळसाला सोन्याचा…

  • माझं घर – MAZA GHAR(MY HOME)

    माझं घर माझं घर घरासमोर डोंगर माझ्या घरात शांतीचा आहे कायम वावर आम्ही दोघे लेकासंगे सदा सुखात अपार लेकीप्रमाणेच लेक व्यवहारा चोख नेक सुवर्णाची रास नाणी माझं घर सोळा खणी माझं घर माझं घर माझ्या लेकीचं माहेर माझं घर माझं घर माझ्या नातीचं आजोळ जावयाच्या संगे येई नात आणि लेक बाई माझ्या घरात गोकुळ ज्ञानीयांची…

  • बोला चाली – BOLA CHALI(CONVERSATION)

    पाखरांची बोला चाली माझ्यासंग साद घाली रानवारा वाहणारा जीव माझा रानमाळी ऊस नारळात गुज टिपतेय काळी माती गारव्यात सावलीत बैसलीया देत हाळी कसं कसं मी सांभाळू जिन माझा खरा भाऊ …