-
ठेका – THEKAA
-
बाधा – BAADHAA
कधी कधी मी माझी आई कधी कधी चित्रातिल दादा कधी खोडकर कृष्ण कन्हैया कधी कधी मी गोरी राधा घननीळाच्या अधरांवरची जशी बासरी स्वरुप सुंदरी तशीच मीही मुग्ध कुमारी प्रिय गझलेतिल रदीफ साधा फिरव अशी जादूची कांडी स्वर अन व्यंजन सजीव व्हावे शब्द असूदे पूर्ण रूप वा किंचित अधुरा अर्धा आधा गझल बोलते मात्रांमधुनी सहज तरीही…
-
अढळ – ADHAL
चतुर्दशीच्या चंद्रासम तव मुखचंद्रावर प्रभा झळकते अर्ध्या मिटल्या नयन पाकळ्या अधरांवरती हास्य विलसते पद्मासन तव आसन शोभे नेत्रांमधुनी बरसे करुणा खिरते वाणी सर्वांगातुन समवशरण भवताली वसते दर्शन घेण्या अरिहंताचे स्वर्गामधुनी इंद्रही येती मूर्त पाहुनी सजीव सुंदर झुळुक हवेची बघ झुळझुळते पुनव चांदणे झरते जेव्हा नभांगणातिल तारे दडती सिद्धशिलेवर शिरोमणीसम सिद्धप्रभूचे स्थान अढळ ते
-
कशास भेटणे तुला – KASHAAS BHETANE TULAA
-
मी तुझी नाही जरी रे – MEE TUZEE NAAHEE JAREE RE
-
कर्माला नूतन रोखू – KARMAALAA NOOTAN ROKHOO
कर्माला नूतन रोखू तू बोट सखीचे धरना आत्माच तुझा हा सुंदर आत्म्यात मला तू बघना करवंदी डोळ्यांमधले बघ काजळ उतरे गाली मिटलेल्या पापण काठी येऊन प्रियतमा निजना काठावर मौन तळ्याच्या जललहरी नाचत येती पाण्यात चांदणे झरते गझलेवर कविता करना हृदयाच्या खोल तळाशी तव दिसते हसरी प्रतिमा तू झुळुक सुगंधी बनुनी अतातरी झुळझुळना रिमझिमत्या आठवणींचा पाऊस…
-
मी पुन्हा जन्मले होते – MEE PUNHAA JANMALE HOTE
तरही गझल – मी पुन्हा जन्मले होते गझलेची पहिली ओळ कवी राज पठाण यांची. जगण्याची इच्छा नव्हती मरणाने छळले होते मरणाच्या उंबरठ्यावर मी पुन्हा जन्मले होते मज वाढायाचे होते जन्मात नव्या या सुंदर पण तनू खंगली झिजली म्हणुनच हळहळले होते नव्हताच दुवा कुठलाही जोडाया नाते अपुले तू समक्ष खात्री द्यावी यासाठी अडले होते मज थोडे…