-
केव्हातरी मिटाया – KEVHAATAREE MITAAYAA
केव्हातरी मिटाया मज लागणार डोळे ढाळू नकोस अश्रू मम तेवणार डोळे शब्दांस गोल झाल्या लावून धार डोळे बनुनी कलम दुधारी करणार वार डोळे पत्रे उडून जातिल कर अंगणात गोळा पत्रांवरी पहाटे दव ओतणार डोळे माती तरूतळीची बकुळीस गोष्ट सांगे माझे तुझे मिळूनी होतील चार डोळे नेत्रांस दान करुनी दृष्टी दिली कुणाला ठाऊक ना जरी हे…
-
सीमोल्लंघन SEEMOLLANGHAN
सीमेचे उल्लंघन केल्यानंतर बोलू पुन्हा वेगळे आल्यावर प्रत्यंतर बोलू भटकुन भटकुन मन थकल्यावर ध्यानाग्नीतुन हरेक ओठांवर हलतो तो मंतर बोलू आंतरजाली फिरती शोधक नित्य इंजिने गूगलवरच्या इंजिनांस त्या व्यंतर बोलू देव पाहण्या नकाच काटू अंतर बिंतर नीतळ आत्म्यालाच स्वतःच्या अंतर बोलू विचार मंथन करण्याचा अन बोलायाचा मला सुनेत्रा आहे ध्यास निरंतर बोलू
-
गुल्लिका – GULLIKAA
विंध्यगिरीवर श्यामल सुंदर जलद दाटले पुन्हा गोमटेश बाहुबलीवर जल मुक्त सांडले पुन्हा हाती चंबू सान दुधाचा टोकावर गुल्लिका धार ओतता धवल दुग्धमय घन कोसळले पुन्हा नीर क्षीर चंदन अन केशर अष्टगंध औषधी प्रपात धो धो सुवर्ण हळदी लोट उसळले पुन्हा पारिजात मोगरा चमेली चंपक जाई जुई सुरभित पुष्पांनी भरलेले मेघ बरसले पुन्हा अखंड रज्जूवर प्रेमाच्या…
-
अभ्यंतर – ABHYANTAR
-
प्रवासी पक्षी – PRAVAASEE PAKSHEE
-
वारा चंचल – VAARAA CHANCHAL
शिशिराच्या पाचोळ्यातिल मज अक्षर अक्षर हाक मारते निरोप घेण्या वाज वाजते वसंत वाऱ्यावरती झुलते पीत पोपटी मृदु पर्णांकुर पाहुन सृष्टी हात जोडते किरण कोवळे चराचरावर मोद सांडता हृदय डोलते … पानांच्या जाळीतुन उतरे ऊन खोडकर हळदी तरुतळ मृदा तळीची उडत राहते वारा चंचल ऊन न चंचल गतकाळाच्या आठवणीतिल पिसे लहरती वाऱ्यावरती संधिकाल की उषाकाल हा…
-
खाडाखोडी – KHAADAA KHODEE
ठेव जपूनी मधुघट भरलेले तव अधरी अधरामधल्या बोलांनी भर हृदय घागरी मौनामधल्या भावभावना उसळुन येता अलबत येते गाजत भरती शुद्ध अंतरी गलबत येता मालाने गजबजते बंदर निवडक मालालाच त्यातल्या ठेव आगरी हस्तलिखीते मुद्रण प्रती भर मोजुनीया खतावणीतिल हिशेब दिसण्या खुल्या अंबरी खाडाखोडीवरती सुद्धा लिही खरे रे वळिवाची सर भिजविल पाने तुझी वासरी मात्रावृत्त (२४ मात्रा)