-
देवनागरी – DEV NAAGAREE (DEVANAGARI SCRIPT)
-
कू – KUU (EARTH)
हळूहळू हे वाजत आहे पानगळीतिल पान वृक्षातळीच्या पाचोळ्याला ऐकू देऊन कान पाचोळ्यातुन ऐकायाला किलबिल किलबिल गान रवीकिरणांचे भू वर आले अगणित सरसर बाण शीळ घालतो सुरभित वारा हरपुन तन मन भान लहर लहरती लता माधवी वेळावीत ग मान जरी छाटली खोडे त्यावर फुटली पर्णे सान पुनव रात्रीला शिशिर नेतसे चंद्रावरती यान उधळुन देती ऋतू सहाही…
-
लोणी – LONI (BUTTER)
-
तराई – TARAAEE
-
नाताळ – NAATAAL (CHRISMAS)
-
अक्षरी धन – AKSHRI DHAN (TREASURE OF WORDS)
जाणिवेने नेणिवेचे हात हाती घेतले रे इंद्रधनुचे पंख झुलते सात हाती घेतले रे रंग ता ना पि हि नि पा जा बुडविताना सागराने भावना उधळून घन उत्पात हाती घेतले रे लोभ टाळुन पारध्याने शर गझाला झेलल्यावर नयन बाणांचे कुरंगी घात हाती घेतले रे चंचलेने उधळल्यावर अक्षरी धन मेघनेतुन ओंजळी भरभरुन ते मी गात हाती घेतले…
-
कोळ्यांची बाळे – KOLYAANCHEE BAALE (SPIDER’S BABIES)
स्वप्न गुलाबी अथवा काळे अनवट झाले त्याचे जाळे नको करू जाळ्याचा गुंता खेळुदेत कोळ्यांची बाळे पोखरती घर मुळे जयांची खणून काढू त्यांची पाळे राव रंक हा भेद जिथे रे त्या गुत्त्याला लावू टाळे विसरायाला स्मृती कालच्या करू नको तू भलते चाळे मम गझलांना जपण्यासाठी नित्य कागदांना मी जाळे सुगंध शिंपायास सुनेत्रा केसांमध्ये जुईस माळे