Category: Marathi kaavya

  • थरथर गात्री – THARTHAR GAATREE

    पाऊस धो धो नऊ रात्री … घट भरता थरथर गात्री…. धारा झरती वेगे झरझर … स्वच्छ जाहले पदपथ परिसर काम तडीला पूर्णच नेले…. हळदी भाळी कुंकुम ठेले… उभा वृक्ष हा शरदात शमी …. नीलकमल फुल उमलले नमी … .. वर्तमान नव सृष्टी सुंदर …. दिव्य लाभता दृष्टी सुंदर ….. मयुर पंख कृष्ण जलद गगनी …..…

  • जादुमयी – JAADUMAYEE

    कलाकार सृष्टी जादुमयी कलाकार वृष्टी जादुमयी मला लाभुदे रत्नत्रययुत कलाकार दृष्टी जादुमयी गूढ धीर तिसऱ्या शेरातिल कलाकार तृष्टी जादुमयी तीन शेरांचे मुक्तक (मात्रा १६)

  • नर्तिके – NARTIKE

    नाच आज खास मस्त रात्र नर्तिके धुंद फुंद जाहलेत गात्र नर्तिके नर्तनात तांडवी जपून नाच तू पातलेत सान मौन छात्र नर्तिके बाण सोडतेस कैक दांडियातुनी भासतेस तेजरूप क्षात्र नर्तिके नाचतात लक्ष लक्ष नर्तिका जरी भावतेस तूच एक मात्र नर्तिके कृष्ण श्याम नील वर्ण मेघ वर्षती सांडते भरून पूर्ण पात्र नर्तिके गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २०)…

  • सोनतुला – SON-TULAA

    धुतल्या तांदूळासम येथे सापडलेका कोण तुला पुरे जाहले अता तोलणे तुला सांगते जोडतुला स्वर्णतुलेची वजने मापे गझलेमधले शिरोमणी त्यांचे प्याले सांडायाची का वाटे रे ओढ तुला डोळ्यावरती बांधुन पट्टी न्यायदेवता उभी इथे न्यायाधिश तू न्याय खरा दे शोभत नाही मौन तुला स्वार्थासाठी कोणी अपुल्या बळी देतसे जीवाचा शरीर पुद्गल सिद्ध कराया दुभंगेल ही सोनतुला नजर…

  • जिवंत वेडा – JIVANT VEDAA

    तरही गझल गझलेची पहिली ओळ, कवी गंगाधर मुटे यांच्या “स्वदेशीचे ढोंगधतुरे” या कवितेची…. एक आणखी झाडावरती लटकून मेला काल दुसरा कोणी रेलखाली तडफडून मेला काल जिवंत वेडा सुंदर जगला मस्तीत नाचत गात नातीगोती माया प्रीती झटकून मेला काल सदासर्वदा सिग्नल तोडे बाईकवरचा स्वार पुलाखालच्या हातगाडीस धडकून मेला काल पाऊस असा धो धो पडला रस्त्यावरती खड्डे…

  • तत्त्वे – TATTVE

    निळ्या कागदी श्यामल गझला संगणकात ठेव अथवा गाडुन त्यांस कुंडीत मातित हात ठेव जीव अजीव आस्रव संवर बंध निर्जरा मोक्ष जैन दर्शनातील तत्त्वे ध्यानात सात ठेव आवडत नसेल वाचन तर लक्ष देऊन ऐक ह्या कानाने ऐकत ऐकत त्या कानात ठेव देहबोली नेत्रबोली अनेक बोली शिकून बोलणं पाहणं ऐकणं चालणं तुझं झोकात ठेव बोल कौतुके काट्यांसंगे…

  • जुडगा – JUDAGAA

    मोक्षाच्या द्वारावर टाळे कैक लागले होते अनेक जुडग्यांच्या भाराने छल्ले झुकले होते एकच टाळा खरा शोधला मी तर्काने माझ्या एकच छल्ला उरला हाती बाकी पडले होते हातांमध्ये घट्ट पकडला किणकिणणारा छल्ला छल्ल्यावर किल्ल्यांचे जुडगे मस्त लटकले होते सोन्याच्या किल्ल्यांचा जुडगा मी नजरेने टिपला रत्नत्रय पारखी नेत्र मम् त्यावर खिळले होते ओंकारातिल पाच अक्षरे पंचपरमपद रूपी…