-
धूप जाळुनी – DHOOP JAALUNEE
जपात रमले ध्यानी रमले तप केले मी शब्द जाळुनी राख जाहली मम् कर्मांची भाव भावना काव्य जाळुनी हृदय जाहले शांत जलासम बिंब प्रकटले सुंदर माझे आत्मस्वरूपी मग्न जाहले छळणारा मी भूत जाळुनी गाळ साठला तळी जलाच्या ओंजळ भरते शुद्ध जलाने नकाच फेकू दगड चुलीचे तुष्णा मिटली काष्ठ जाळुनी जात पात इतुकी ना मोठी त्याहुन मोठे…
-
प्रिय प्रिय मजला – PRIY PRIY MAJALAA
मी न घालते नियम दुजावर बंधन घाले मी माझ्यावर माझा संयम प्रिय प्रिय मजला माझ्या सौंदर्यावर भुलला अस्त्र लेखणी भेदुन लक्ष्या जाळ्यामध्ये पकडे भक्ष्या शस्त्र लेखणी फिरे मनावर काळी शाई झरते झरझर जलद सावळा बरस बरसतो भाव भावना झिमझिम झरतो अक्षर अक्षर उजळत जाते त्यात लख्ख ब्रह्मांड झळकते
-
ब्रह्मांड अवघे – BRAMHAAND AVAGHE
जादुई शब्दात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जादुई काव्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जे हवे ते मिळविण्या मी कोष विणते दिव्या ऐसा जादुई कोषात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे नेणिवेतिल स्वप्न अंबर ओतते राशी धनाच्या जादुई स्वप्नात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे देह माझा एक चुंबक खेचुनी घेई सुखांना जादुई आत्म्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे मी “सुनेत्रा” जाणतेकी…
-
स्वरदा – SWARADAA
सत्य प्रिय मी मला प्रिय मी सत्य प्रिय मी झुला प्रिय मी कृष्ण घन लेखणीत झरे सत्य प्रिय मी कला प्रिय मी शब्द शर लक्ष्यभेद करी सत्य प्रिय मी बला प्रिय मी न्याय कर आंधळ्या बरवा सत्य प्रिय मी तुला प्रिय मी सांग तिज ऐकण्या गझला सत्य प्रिय मी जिला प्रिय मी झाड मज बोलले…
-
अक्षरपुष्पे – AKSHAR-PUSHPE
क्षमाच केली मी मजलाही मार्दवात मम् भिजे इलाही घाट चढाया मोक्ष-मुक्तिचा आर्जव माझे झाले राही निर्मल आत्मा दवात न्हाता शौच अंतरी दिशात दाही भादव्यातले ऊन तप्त हे कैसे माझे तन मन साही बोल बोल प्रिय माझ्यासंगे प्रिय वचने तू सुंदर काही सरस्वती शारदा सुंदरी अक्षरपुष्पे तुजला वाही दर्पणात अन नयन जळी तव जिनबिंबा मी सदैव…
-
गुगली – GOOGLY
कधी न घेते फोडुन डोके गुगली कोडी सोडविण्या त्यापेक्षा मी गझलच लिहिते असली कोडी सोडविण्या पटकन मजला हे कळते की जे ना अपुले धरू नये चुकून धरले तर ना डरते धरली कोडी सोडविण्या नक्कल करुनी कोडी रचता मिळणारे सुख क्षणिक असे आहे वेळ म्हणून का शिणू अडली कोडी सोडविण्या जन्मदिवस वर्षातुन अपुला फक्त एकदा खरा…
-
उत्तम मार्दव – UTTAM MAARDAV
कोमल जल खडकांस कापते तैसे मार्दव सृष्टी जपते… फुलाप्रमाणे मृदू बनावे गुणानुरागी सुरभित व्हावे….. हृदयपाकळ्या उमलुन येता झुळकीवर हलके लहरावे,…. चंद्रकिरण प्राशून कुमुदिनी जैसी फुलते … मुनीमनातील वचने स्मरुनी आपण गावे…. आजचा दिवस उत्तम मार्दव…. सर्व साधर्मि बंधु-भगिनींस उत्तम मार्दव धर्माच्या हृदयपूर्वक शुभेच्छा !!!