Category: Marathi kaavya

  • ध्यानअग्नी – DHYAAN AGANEE

    नेणिवेतिल सुप्त इच्छा जाणुनी ये जे तुला मिळवायचे ते पाहुनी ये अंतरातिल गूढ निर्झर नित्य वाहे भावघन सामर्थ्य मिळण्या प्राशुनी ये घे प्रवाहाच्या दिशेने लहर आतिल आतल्या हाकेस सुमधुर ऐकुनी ये मी कधीही रुग्ण नव्हते सजग होते हे लढाऊ आर्जवाशी बोलुनी ये मी क्षमाशिल संयमाने क्रोध त्यागे मार्दवाशी मैत्र होण्या तापुनी ये देहकाष्ठा वाळलेल्या शिस्त…

  • गणपती येत आहे – GANAPATEE YET AAHE

    गणपती येत आहे ताट भरा मोदकाचे लवकरी लवकरी गणपती येत आहे वसन नेस नऊवारी भरजरी लवकरी पावडर पीतांबरी आण घास विसळ भांडी तांब्या-पितळेची गणपती येत आहे सान गोड पोर हो तू परकरी लवकरी तबकात अष्टद्रव्ये लख्ख पीत ताबाणात फुले रचु तांबडी गणपती येत आहे आरतीस जमा सारे मम् घरी लवकरी गणगोत स्वागताला खास आम आले…

  • सहस्त्रदलयुत जिननाम – SAHASTRA DALAYUT JIN NAAM

    पर्वराज पर्युषण येता दशधर्मांना जपू अंतरी निसर्गातला धर्म अहिंसा स्वधर्म मानुन बघू अंतरी ज्या धरणीवर जगतो मरतो तिलाच आपण दूषित करतो त्या पृथ्वीचा धर्म क्षमेचा निष्ठेने आचरू अंतरी आत्म्यामधले मार्दव अपुल्या जगात साऱ्या कोमल असते प्रेमभाव जीवांप्रति तैसे प्रेम पेरुया मृदू अंतरी मन वचने कायेत सरळपण याला आर्जव जैनी म्हणती कृतीत येण्या आर्जव सहजी मुनीमनासम…

  • बियाणे – BIYAANE

    पिकवीन सोनं मी गझलेच्या जमिनीमंदी झिजवीन जोडं मी गझलेच्या जमिनीमंदी रचून पोती शब्दधनाची येता गाडी अडवीन गाडं मी गझलेच्या जमिनीमंदी पेरायाला नक्षत्रांचे खरे बियाणे उसवीन पोतं मी गझलेच्या जमिनीमंदी प्रीती भक्ती शक्ती माझी सफल व्हावया उधळीन दाणं मी गझलेच्या जमिनीमंदी पाडायाला सरी मोतिया रिमझिम झिमझिम बसवीन जातं मी गझलेच्या जमिनीमंदी

  • मंझिल – MANZIL

    शब्द माझे सारथी अन शब्द माझे धन खरे हे शब्द माझे सारथी अन शब्द माझे बल खरे हे स्वच्छ करण्या मार्ग माझा हृदय माझे बिघडलेले शब्द माझे सारथी अन शब्द माझे जल खरे हे भेदण्या लक्ष्यास अवघड गाठण्या मंझिल नव्याने शब्द माझे सारथी अन शब्द माझे शर खरे हे चुंबण्या आकाशगंगा डुंबण्या पाण्यात निळसर शब्द…

  • भगवती – BHAGAVATEE

    घनतमी किती या संहार जाहला जरी प्रतिबिंब जळी मी पाहिले दिव्याचे परी मन खरे मला हे सांगून सांगून बघे भगवती उषेला मंत्रात बांधुनी घरी झरणार शब्द घन दाटून येता हृदये श्रावणी धनाची लयलूट करूया हरी मुक्तक(तीन शेरांचे,मात्रा २३)

  • कुकडी – KUKADEE

    सजग जाहला ना मोहरला अजिंक्य ठरला भरला प्याला सरळ सरळ जाहल्यावरी तू प्यावा सरला भरला प्याला पात्रामधला नाद सुरे ऐकत थरथरला भरला प्याला ओतत ओतत जलास कोणी म्हणते झरला भरला प्याला अंतर्यामी तुझ्या नि माझ्या मूर्त साजिरी डुलते आहे अंतरातल्या जलास निर्मल भरून भरला भरला प्याला चिखलामधल्या कमळी फसला उदक शिंपुनी पवित्र झाला झळाळणाऱ्या मृगनीरावर…