Category: Marathi kaavya

  • माग..डब्या – MAAG…DABYAA

    तीन शेरांचे मुक्तक … माग यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते माग शोधुनी काढायाला पी जे मनास वाटे ते चिखलामधले अगणित काटे दंश कराया टपलेले माग त्यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते भरला प्याला सांडूदे तव भिजण्या सारे शेर तुझे माग वाचुनी काढायाला पी जे मनास वाटे ते दोन शेरांचे स्वर काफिया मुक्तक……

  • मिठी – MITHEE

    अविरत माझ्या मनात कविता काव्य आणखी गझल नाचते अविरत माझ्या मनात वनिता काव्य आणखी गझल नाचते कृष्णा तापी मिठी सावित्री उधाणताना सळसळताना अविरत माझ्या मनात सरिता काव्य आणखी गझल नाचते गंगा झेलम पवना सिंधू नांदायाला निघती जेव्हा अविरत माझ्या मनात दुहिता काव्य आणखी गझल नाचते तेजस शशधर भास्कर शीतल दो नेत्रांतुन बघता पृथ्वी अविरत माझ्या…

  • ग्रीष्माची काहिली – GREESHMAACHEE KAAHILEE

    देहा अवघ्या तपवित आहे ग्रीष्माची काहिली पावसातही जाळे दाहे ग्रीष्माची काहिली हळूहळू उतरेल तप्तता भिजवुन गात्रे पुरी शीतल करण्या वारा वाहे ग्रीष्माची काहिली दवाच दे मज पथ्य नको पण म्हणते म्लान परी पुसते कारण स्वतःच काहे ग्रीष्माची काहिली शुद्ध निरामय आरोग्याची मिळे संपदा फुलां मारुन जंतू सत्यच पाहे ग्रीष्माची काहिली आजारीपण पळवुन लावुन नाचनाचुनी पुन्हा…

  • शुभ्र लिली – SHUBHRA LILEE

    निशिगंधाच्या हारामध्ये लाल गुलाबांचा वावर ग शुभ्र लिलीची दले मलमली त्यात सुगंधाचा दरवळ ग कण्हेर कोरांटीचे कुंपण साद घालिते का चाफ्यास ते न शोधिते त्यातिल अत्तर जाग ऐकुनी ती सळसळ ग अरिष्टनेमीचे शोधाया कूळ गाडले जे मातीत मत्त गाढवे म्हणती दाबुन उमद्या घोड्या त्या खेचर ग मानस्तंभ तो ऐसा शोभे कषाय विरहित होऊनिया जिनमूर्तीचे घे…

  • आड – AAD

    बाळगणेशा रूप साजिरे बाळगणेशा खूप साजिरे विघ्नविनाशक श्रावणी सरी बाळगणेशा धूप साजिरे कढवुन लोणी शुभ्र मिळविले बाळगणेशा तूप साजिरे जोहड विहिरी आड देखणे बाळगणेशा कूप साजिरे पाखडण्या धान्यास आणिले बाळगणेशा सूप साजिरे गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १६) लगावली – गाललगागा/गालगालगा/

  • मला आवडे ग – MALAA AAVADE G

    मला आवडे ग लिहायास काही तिला आवडे ग जपायास काही कुणी आवडेल तिलाही दिवाना फुला आवडे ग पहायास काही रुमालावरी न रुमालात पक्षी भला आवडे ग भरायास काही नको ते रितेपण वाट्यास तिचिया जिला आवडे ग विणायास काही धुंवाधार श्रावण आषाढ झिमझिम जला आवडे ग धरायास काही गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – लगागा/लगाल/लगागा/लगागा/

  • जांभळ्या – JAANBHALHYAA

    कळ्या गुलाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या कळ्या नवाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या भाव सांडती नेणिवेतील जाणिवेतील कळ्या शराबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या सुरभित करिती परिसर पावन रंगबिरंगी कळ्या शबाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या हजर जाहल्या हजरजबाबी बोल उधळण्या कळ्या जबाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या कानामध्ये सांगतिल मज कशी बोचली कळ्या खराबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या…