Category: Marathi kaavya

  • वेल – VEL (vine)

    वाटेवरले टाळत धोंडे वेल कपारीवरी जिजीविषेने वर वर चढते वेल कपारीवरी चढता चढता पुढे लागता संगमरवरी घाट जगण्यासाठी खाली उतरे वेल कपारीवरी वेल न म्हणते मी तर नाजुक कशी कळ्यांना जपू मूक कळ्यांचा भार वाहते वेल कपारीवरी प्रकाश माती हवेत राहुन पाणी शोषायास हवे तेवढे वळसे घेते वेल कपारीवरी ऋतू फुलांचा वसंत येता बहरून सळसळुनी…

  • चैत्यालय – CHAITYAALAY

    काळी काळी, काष्ठे शिसवी, रचून न्यारा, बनला अपुला, एक बंगलो, स्वतःत रमण्या… अनुपम चैत्यालय मनमंदिर, मूर्त पाहुनी, तीर्थंकर भक्तीत झिंगलो, स्वतःत रमण्या…. भक्तामर स्तोत्रातिल कडवी, अठ्ठेचाळिस, भक्तांसम कंठस्थ व्हावया,भक्ती केली… दर्शन केले, पूजन केले, जिनदेवाचे, गुणानुरागी होत खंगलो, स्वतःत रमण्या…. धुवांधार पावसात न्हाउन, उभी रिंगणे, गोल रिंगणे, करून नाचत चिंब जाहलो… वारीमध्ये, अभंग ओव्या म्हणता…

  • तीर्थङ्कर- TIRTHANKAR

    कमलासनात लक्ष्मी.. पद्मावती देवी… खळाळणारा झरा.. प्रपातातही देवी…. गणेशरूपी ऋद्धी.. मंतर गुणी सिद्धी घडा जलाने भरते.. जिंकुनी घन युद्धी ङ्ग् वांङ्मय जणु जिनचंद्र..जिनवाणी अक्षरबद्ध कमलासनात लक्ष्मी …………कमलासनात लक्ष्मी ………… चरखा फिरतो गरगर.. सूत कातण्या छान छबी आरशातली.. पाहुनी  पान जटाभार डोंगरी.. त्यातून ठिबके नीर झरा बनुनी धबधबा.. सांडतो धवल क्षीर ञ ञकार हे अधिपती.. आहे…

  • पुणे – PUNE

    सिटी पुणे जसे तसे असेन मस्त स्मार्ट मी सिटीत पिंपवड जसे जगेन मस्त स्मार्ट मी सिटीत पिंपवडमधे सुजाण माणसे खरी तयातले कवीगुणी स्मरेन मस्त स्मार्ट मी वरून पिंपरी जरी जहाल खूप वाटते तिच्यामधील मार्दवा जपेन मस्त स्मार्ट मी सचैल चिंचवड पुरे भिजून चिंब पावसी तसेच पावसात या लिहेन मस्त स्मार्ट मी जलात नाच नाचती मयुर…

  • यष्टी – YASHTEE (stick)

    ताल मज साधायचा सूर मज पकडायचा लय मला पकडायची… माझिया गझलेतली…. भावघन गाण्यातला भाव मज सांडायचा अर्थ पण जाणायचा… माझिया जगण्यातुनी …. गोष्ट मज ऐकायची गोष्ट मज सांगायची गोष्ट मज वाचायची… माझिया दृष्टीतुनी …. मिळविली दृष्टी खरी जगवुनी सृष्टी खरी अंतरी यष्टी खरी … माझिया धर्मातली….

  • भीजपाऊस – BHEEJ PAAOOS (steady gentle rain, drizzle)

    भीजपावसा अता भिजव मृत्तिका गावयास सावळी तलम मृत्तिका मृत्तिकेस बावऱ्या रंग लाव तू रंगल्यावरी घटास भरव मृत्तिका दाटल्या नभापरी वस्त्र जांभळे नेसवून घाटदार घडव मृत्तिका डौलदार चालते वीज प्राशुनी वाटते जणू सुरा सजल मृत्तिका गझल गात शिंपते चांदणे जळी वाहतेय सुंदरा तरल मृत्तिका गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – गालगालगालगा/गालगालगा/

  • भृंग – BHRUNG

    पैंजणात कंकणात वाज वाज तू शीळ घाल मुक्त गात नाच नाच तू रंगरूप साजिरे तुझे फुलापरी चुंबताच भृंग हो ग लाल लाल तू वेगवेगळ्या तुझ्या कलांस दावुनी चांदण्यात भीज आज चिंब चिंब तू ओळखून वृत्त मधुर प्राश रक्तिमा रंगवून ओठ ओठ गाल गाल तू गर्द कंच रान नील मोर नाचतो लेखणीस धार लाव मस्त मस्त…