-
करतळ – KARATAL
पाचोळा अन हिरवळ भूवर आठवणींचा दरवळ भूवर तव पदराची सळसळ भूवर कुणा वाटते मृगजळ भूवर किणकिणणारी कांच कंकणे जणू झऱ्याची खळखळ भूवर मृणाल कैसी फसेल चिखली उमटव उमटव करतळ भूवर नाच ‘सुनेत्रा’ जलदांमधुनी झरण्या मौक्तिक घळघळ भूवर गझल मात्रावृत्त – १६ मात्रा
-
नाकी नऊ – NAAKEE NAOO
माझे मन माझे तन जपे आठवांचे क्षण वारियाने हलतात जणू दाटलेले घन जसे फांदीवर पुष्प तसे मुक्त माझे मन शीळ घालतोय वात शहारते सारे बन सुगंधीत रान मस्त मातीचाया कणकण नाकी नऊ आणेन सोड तुझा मूढे…पण आत्मरुप संपदेचे सुनेत्रात सारे धन गझल मात्रावृत्त – १२ मात्रा
-
मोजमाप – MOJAMAAP
गान हृदयीचे वा देहाचे ते गाणे असते इंद्रियांच्या शक्तीचे ते मोजमाप असते अपुले अपुले गाणे सुंदर आपण गावे द्यावे गाता गाता जगत अलौकिक दिपवुन टाकावे कधी न करावी चोरी आपण दुसऱ्यांच्या पैशांची स्वकष्टाने धन कमवावे मिळेल सुख शांती वंशवेल वाढण्या आपुली कुटुंब जपणे धर्म देशाचे स्वातंत्र्य टिकविण्या अभिव्यक्ती धर्म
-
पिशाच – PISHAACH
टोणा करणी करती भोंदू व्यंतर योनी मिळावया नर पशु पक्षी बळी देउनी पिशाच टोणी मिळावया तृतीय पंथी हिजडे हिजड्या फिरती दारी जगण्याला त्यांनाही दे मार्ग तपस्या शीतल लोणी मिळावया शुचिता हृदयी वाढत जाता संयम येतो कृतीमधे सत्य प्रकटते रत्नत्रय रत्नांची गोणी मिळावया आर्जव मार्दव ब्रम्हचर्य अन अकिंचन्य युत धर्म क्षमा पालन करती जीव एकटे प्रियतम…
-
लगाम – LAGAAM
गझल लिहावी की कविता मी प्रश्न मला ना पडे अताशा लिहीत जाता स्फुटे मनातिल पाचोळा नच उडे अताशा शांत शांत हृदयातिल पाणी कुणा न दिसती तरंग त्यावर तरी स्तब्ध त्या सलिलावरती जिवंत नाते जडे अताशा संपुन गेले भय उरलेले लगाम काळाचा तव हाती त्यास बांधण्या सज्ज कपारी खुणावती मज कडे अताशा अक्षत अक्षत धुवून सुकवुन…
-
एक कोकरू – EK KOKAROO
एक कोकरू हुंदडणारे … पण आकुळलेले काळ्या डोळ्यांमधे वेदना … होते बावरलेले … कुणी अनामिक अनोळखी जरी…. कुशीत अलगद शिरले … कवळुन घेता प्रेमभराने शांत शांत जाहले… तृप्त अनामिक तृप्त कोकरू … नेत्र मेघ भरले … जलदांमधुनी थेंब टपोरे गाली झरझरले …. अधरांवरती हलके हलके …. हसू निरागस फुलले …
-
शिशीर गान – SHISHEER GAAN
पाऊस यावा अंगणभर अंगांगी काटे कुंपणभर आवाज यावा ढगी गड गड पडाव्या गारा छपरावर वेचाया हातांची ओंजळ करू मुठीत मोठाल्या गारांना धरू मंडपी चिंब जाई नि जुई जा ग जा चिऊ घरट्यात बाई जा उड रे काऊ शुभ शुभ गाऊ शिशिरात बुडण्या धारांत न्हाऊ