-
गाथा – GAATHAA
अध्यात्माच्या गाथा सुंदर फक्त पाठ ना केल्या मी वाच्यार्थाला जाणुन त्यांच्या अनुवादित ही केल्या मी जाणुन घेउन वाच्यार्थाला अनुभवसुद्धा घेते मी मनापासुनी तपात रमते मौन रम्य अन घेते मी गूढ बोलुनी मूढ बनोनी कुणी मोकळे होते हो दिवस लोटता शल्य तयांच्या अंतर्यामी टोचे हो पोपटपंची ना मी करते पोपटास पण मुक्त करे गुरुवर आच न…
-
हित – HIT
आत्म्याचे हित कशात रे आत्म्याचे हित सुखात रे सुख आकुळता रहितच रे सुखात व्याकुळता नच रे आकुळ व्याकुळ स्थिती करी तगमग तगमग जीवाची तगमग संपे जीवाची कास धरुन अध्यात्माची अंतर्दृष्टी ज्यांना रे सम्यगदर्शन त्यांना रे अंतर्दृष्टी उघडाया खऱ्या गुरूला जाणूया दर्शन शास्त्रे खरी खरी खऱ्या गुरूची वाच तरी मात्रावृत्त – १४ मात्रा
-
क्रम – KRAM
भूत भविष्य नि वर्तमान रे यांचा क्रम तू नीट लाव रे वर्तमान ज्यांचा रे सुंदर भविष्य त्यांचे सुंदर सुंदर भूत ही ज्यांचा अतीव सुंदर वर्तमान पण निश्चित सुंदर वर्तमान जर नसेल सुंदर कर्तव्याचे पालन तू कर नको उसासा अन सुस्कारा शिक्षा मिळते कामचुकारा भूतांमधल्या दोषांवरती नको कुरकुरू जगण्यावरती चुकांमधूनी शिकत रहा तू वर्तमानि या घडत…
-
सोंगाडे – SONGAADE
अनंत रूपे घेउन छळण्या कैक भेटले सोंगाडे सिद्धपथाला तुक्या लागला जरी कुणी ना वाटाडे किती भामटे भोंदू साधू भोळे शंकर भासविती डोईवरच्या जटा वाढवुन घालुन फिरती अंबाडे आकाशातिल ग्रह ताऱ्यांना कुंडलीत का बसवीती दिशाभूल करण्या भोळ्यांची लुटण्या त्यांना थापाडे मृत व्यक्तीचे शरीर जाळुन अथवा मातीत गाडून नाश पावते तनु अन उरती फक्त सापळे सांगाडे खरी…
-
सैपाक – SAIPAAK
पहाट झाली बाई आता- सैपाकाची घाई विसळ भांडी विसळ गुंडीत ताक घुसळ मळ कणिक मळ दाब नळाची कळ पालेभाजी ताजी धुवून चिर भाजी फोडणी घाल झकास खमंग तिखट खास पोळ्या लाट पोळ्या मऊ मऊ पातळ भाज हलके हलके करू नको वातड गोल गोल डबा त्याला स्वच्छ धुवा कोरडा छान करा त्यात जेवण भरा
-
पवनचक्की – PAVAN CHAKKEE
आला आला वारा रे पाऊस आणिक गारा रे चल चल जाऊ खेळाया अंगणी गारा वेचाया पागोळ्या झरझरती ग झरे नद्या खळखळती ग भरून ओढा वाहे ग ऊन त्यावरी सांडे ग सोनेरी पाणी झाले बिंब केशरी वर डोले शिंदीची झाडे डुलती बकऱ्या सान तिथे चरती हिरवळ धरणीवर हिरवी पवनचक्की मारुत फिरवी सूर्य निघाला झोपाया पुन्हा पहाटे…
-
हंगामा – HANGAAMAA
वृद्ध घालता धिंगाणा किती माजला हंगामा नाठी बुद्धी साठीला प्रत्यंतर बघ हा दंगा आजोबांच्या काठ्यांनी चोपचोपले अंगांगा आगडोंब वळ उठलेहे बोलव आगीच्या बंबा बंबाची वाजे घंटा पोरांनो थांबा थांबा गझल मात्रावृत्त (मात्रा १४)