-
पुदगल द्रव्य गुण – PUDGAL DRAVY GUN
पुदगल द्रव्याची गुणचर्चा करते स्वरुप विचार संक्षेपाने विचार करता त्याचे चार प्रकार त्या चारांचे सुद्धा पडती आणखी उपप्रकार विस्ताराने विचार करता होती वीस प्रकार स्पर्श रस अन गंध वर्ण युक्त असते पुदगल द्रव्य म्हणून त्यांचे महत्व असते जीव जाणती भव्य स्पर्शनइंद्रिय यांच्या द्वारे जाणावा गुण स्पर्श चार युगलांमध्ये बसवूत त्यांचे आठ प्रकार चिकट सुकट नि…
-
भेद पर्याय – BHED PARYAAY
पर्यायांनी दहा युक्त हे, पुदगल द्रव्य प्रकार पर्याय सहाव्या भेदाचे, असती सहा प्रकार करवत करकर लाकुड कापे, उत्कर साठत जाय भुसा म्हणतसे त्याला कोणी, हे पण त्याचे नाव धान्य दळाया जाते फिरते घरघरते अलवार भरभर सांडे पीठ भोवती, चूर्ण तया म्हणतात मडके फुटता खंड विखुरती, जमिनीवरती फार त्या खंडांना खापर म्हणती, बोलीचा व्यवहार कडधान्याला भरडुन…
-
शीळ – SHEEL
श्रावणातलया नीळ घनातिल रिमझिम जल बरसे सहज सुटोनी पीळ मनातिल रिमझिम जल बरसे मोरपिसारा फुलवुन नाचे मयुर गवतावरी पडता कानी शीळ बनातिल रिमझिम जल बरसे
-
शब्दबोली – SHABD-BOLEE
भाषारूप नि रूप अभाषा, यांच्याद्वारे शब्द उमटती.. शब्दाशब्दामधले अंतर, अंतरात त्या भाव प्रकटती… भाषारुप शब्दांच्यामध्ये, अक्षररूपी मनुष्य बोली.. चिव चिव बें बें खग नि पशूंची, रूप अनक्षर उपजत बोली… रुपी अभाषा स्वरुप शब्द दो, प्रायोगिक अन स्वाभाविकही.. पुदगल शब्दांचेच भेद हे, चर्चा करता पर्यायाची… मनुज छिन्नीने दगड फोडतो, ध्वनी उमटतो, तो प्रायोगिक.. मेघ वीज वा…
-
अंतरीचा सोनचाफा – ANTAREECHAA SONCHAAFAA
अंतरीचा सोनचाफा तू तया पाहून घे सौरभाला लूट त्याच्या कुंतली माळून घे कुंतलांना सांग कुरळ्या वारियावर लहरण्या मोकळे होऊन त्यासम मस्त तू गाऊन घे नीर शीतल साठलेले लिंब हो काठावरी चंद्रकिरणांच्या सरींनी चिंब तू न्हाऊन घे सोडुनी पाण्यात पाया बैस तेथे क्षणभरी विसरलेल्या पैंजणांना तू पुन्हा बांधून घे बिंब तव पाण्यात सुंदर पाहुनी आश्चर्य का…
-
वनदेवी – VAN DEVEE
बकुळ फुलांच्या अगणित राशी तळी साठल्यावरी परिमल जाई वाऱ्यावरुनी वनदेवीच्या घरी वनदेवी मग निघे तरुतळी परिमल प्राशायास सुगंधात त्या वनास अवघ्या भिजवाया भिजण्यास अर्ध्या वाटेवरती भेटे तिज वेडा पाऊस अडवुन तिजला म्हणे मैत्रिणी नको तिथे जाऊस मृदगंधाला लुटून पुरते चल लोळू मातीत खळखळणाऱ्या ओहोळांचे ऐकूया संगीत धारेसंगे खेळत फुगडी दाव निराळा बाज मजेमजेने चरण्यासाठी उन्हात…
-
संशोधन – SANSHODHAN
संशोधन वा असो माहिती मला न कळलेली आता आता मला मिळाली थोडी जळलेली आवडल्यावर समजुन घेणे ही प्रीती असते अनोळख्याला समजुन घेणे अवघड भलते असते गुणगुणता मी अधरी आली ओळ सहज सहज … भलते सलते अर्थ कशाला डोक्याला ताप … .