Category: marathi kavya

  • नंदनु – NANDNU

    अती लघुत्तम कथा नंगुडी दात्री पटवारी अतीव लटपट कलिके नंतर दाटी पळणारी असीम लवचिक कळा नंबरी दाई परदेशी अलगुज लटके कळ नंदीश्वर दामे पटणारी अविनाशी लय करात नंदनु दाजी परमोही अरुलता करी नंदादीपक दाखल परनारी अग्नी लवलव कशा नंदिनी दामाजी पवना अनवट लसती कट्यार नंगी दावत पथावरी अवचित लपुनी कचरा नंदा दाबे पटपट असली ललना…

  • धोंडा – DHONDAA

    साजिरें गोंडस… बाळ गणेश …. नाचे पदी बांधूनिया चाळ .. गणेश …. धृ. पद मावळात धूप पावसाचा खेळ… मुळा इंद्रायणी बेरजेचा मेळ .. पवनेच्या काठी… धोंडा श्रावणाचा ….. झाळ गणेश .. ढेकळे तापली रान धुमारले … कीड मारूनिया ऊन विसावले .. मृण्मयी करात .. धरी नांगराचा … फाळ गणेश … दिशा झुंजूमुंजू कुंकवात न्हाती ..…

  • चौखूर – CHOUKHUR

    उधळले घोडे रणी चौखूर आता संयमाचा बदलला बघ नूर आता आज मी पण या घडीला संकटांना ठोकल्यावर जाहली ती चूर आता मासळी बाजार नाही भरत देही काजळेना लोचनांना धूर आता लाभल्यावर दूरदृष्टी आत्मश्रद्धा संपला तो काळही निष्ठूर आता सांजवाती तेवताती मम सुनेत्री अंतरी ना माजते काहूर आता

  • मुन्ना मुन्नी – MUNNA MUNNI

    आठवतो मज माझा कुरळ्या जावळातला मुन्ना मर्फी आठवते मज माझी गुबरी लेक बाहुली मुन्नी बर्फी मोठा झाला शिकला घडला संस्कारानी जिनधर्माच्या सत्य अहिंसा जपण्यासाठी लढला मुलगा मुन्ना मर्फी मोठी झाली कन्या शिकली गुपित जाणुनी स्वधर्म जपूनी कुटुंब अपुले सुखी व्हावया लढली मुलगी मुन्नी बर्फी कुटुंब अमुचे समृद्धीने धनधान्याने भरून वाहण्या वाहन घर धन जमीन जुमला…

  • खेळ – KHEL

    आत्मा माझा गुरू खरा निश्चय नय हा धरू खरा व्यवहाराची साथ मिळे खेळ जाहला सुरू खरा पुद्गल असती शब्द जरी मंत्र अक्षरी भरू खरा लंबक दोले हळूहळू भाव अंतरी झरू खरा मूर्त सुनेत्रा घडवाया चिरा चिऱ्याने चिरू खरा

  • खाक्या – KHAKYAA

    मौन काव्या कळे सख्य माझे तुझे मौन अधरी भले सख्य माझे तुझे नित्य सौख्यात मी रोज तैसाच तू मौन उघडे दळे सख्य माझे तुझे दावता पोलिसी कडक खाक्या तुझा मौन किंचित हले सख्य माझे तुझे मस्त माझ्यात मी मूक होते सखे मौन सखये तळे सख्य माझे तुझे शोध कोठे सखी गुप्त झाल्या सख्या मौन मुक्ताफळे…

  • किमयागार – KIMAYA-GAAR

    करमत नाही मम जीवाला घराशिवाय मैत्र जवळचे खरे कुणाशी स्वतःशिवाय भरती आली अन ओहोटी पाठोपाठ सागर तीरी अगणित मासे गळाशिवाय तडफडणाऱ्या मासोळ्यांचा खच रेतिवर तप्त वालुकी जगतिल कैश्या जळाशिवाय उभ्या आडव्या रेषा रेखुन तर्जनीने खेळ रंगतो मृदुल मृदेवर पटाशिवाय हृदय जिनालय शुद्ध भाव मम किमयागार पूजन करण्या चरण कुणाचे जिनाशिवाय