-
घटाव – GHATAAV
आत्मप्रदेशी तरंगणारा तणाव माझासबब अहिंसेकडेच आहे झुकाव माझा मणी असूदे अथवा पाते दांड्याविन तेघुसळण होण्या पृष्ठावरती दबाव माझा घाटदारला शब्द बोलिचा घटाव सुंदरअर्थ काढणे स्वतःस हितकर सराव माझा शोध मुमुक्षु मणी तळी जो रुतून बसलाअज्ञानी मूढांना लागे न ठाव माझा काकडारती केका घन्टा बांग नमोस्तूशुभ भावांच्या भरतीमधुनी उठाव माझा
-
ओळख – OLAKH
वेदीवरली गजान्तलक्ष्मीफुगून रुतली गजान्तलक्ष्मी अंधपणाने करून प्रीतीमरुन जन्मली गजान्तलक्ष्मी कबूल कर तू चुका स्वतःच्यातुझीच चुकली गजान्तलक्ष्मी आत्मपरीक्षण स्वतः स्वतः करओळख असली गजान्तलक्ष्मी केवळ हो हो शून्य आचरणमला न पटली गजान्तलक्ष्मी
-
हालदारी – HAALDARI
बांगड्या भरणार आहेभूमिका कासार आहे हालदारी सूर्य बुडतासमईचा आधार आहे मांडली भांडी दुकानीजाहले बोगार आहे काफिया होशील जेव्हांबिलवरांना धार आहे रंगता मेंदीत तळवेपाटली चढणार हे
-
करवत – KARVAT
करवतरणी मेरु शह वर डुलणारा जल करवत रजनीरती मेखला शर वलयांकित डुब जप कवी रमणीलगावली नच मात्रा मोजा आठ आठ नि दहाआप सुनेत्रा वृत्ती मधुरा इरा वती पद्मा वृत्ताचे नाव – पद्मावतीवृत्त प्रकार – मात्रावृत्तकाव्यप्रकार – रुबाई
-
फुलमाला – FUL MALAA
घे विश्रांती करे विनंती जलदाला पृथ्वीघे म्हणते मम माळ कुंतली फुलमाला पृथ्वी वेषांतर करुनी नित सृष्टी नक्षत्रे उधळीघेय म्हणे खांद्यावर कम्बल वाऱ्याला पृथ्वी रत्नकम्बला मी का द्यावे म्हणता शिरोमणीघे रत्नत्रय म्हणे क्षमावणि इंद्राला पृथ्वी कशास मस्ती सांग दुजांच्या जीवावर जीवाघे व्रत सुंदर कानी सांगे जीवाला पृथ्वी पद्मावती जिनशासन देवी पारसनाथाचीघे वीणा पुस्तक हाती तव वनमाला…
-
अवतार – AVATAR
अरे माणसा हा झमेला कसा रे कर्म बांधतो तो अकेला कसा रे जरी खाक लंका पुरी जाहलीया वाचला जिनांचाच ठेला कसा रे बिटरघोर्ड म्हणते जरी कारल्याला तरी शब्द घेते करेला कसा रे न घोडे न घोड्या न राऊत कोणी इथे हा ऊभा मग तबेला कसा रे अवतार घेऊन प्रसादास लाटे तुझा देव इतुका भुकेला कसा…
-
खरा सोबती धरतीचा – KHARA SOBATI DHARTICHA
हृदयी स्थापित मम आत्मा, ईश्वर माझा मम आत्मा. आत्म्यासंगे बोलत मी, करते कर्मे सदैव मी. निसर्ग अवती भवतीचा, खरा सोबती धरतीचा. प्राणवायूचे कोठार, उघड उघड.. म्हणते द्वार. शुद्ध मोकळी हवा हवी, गोष्ट सुचाया पुन्हा नवी.