-
अष्टाक्षरी – Ashtakshari
अप्रतिम अष्टाक्षरी ..आहे जातिवंत खरी … जात पात पाहतो जो …त्यास धुण्या बाई बरी अप्रतिम अष्टाक्षरी …आहे जातिवंत खरी.. अप्रतिम शब्द धारा …णमोकार मंत्रातली.. जात पाते लखलख ..परजते क्षत्राणी मी अप्रतिम दृष्टी आत्म्यातुला पाहण्यास येते… धुते कषाय मनीचे..तुझ्या चरणी झुकते… अप्रतिम कळा सोसे…नार तुझ्या जन्मासाठी… होते नरवीर नारी.. पुरुषार्थ करणारी… अप्रतिम आत्मपणा…सत्य अहिंसा हा धर्म..…
-
पूज्यपाद – PUJYAPAD
सत्पात्राला दान द्यावया पसा भरावा वेळोवेळीझऱ्याजवळच्या शेतामधला मळा कसावा वेळोवेळी काच मनाची नको तापवुस त्यापेक्षा ती नितळ राहण्याऐनक असुदे अथवा ऐना स्वच्छ करावा वेळोवेळी असो मंदिरी कचेरीतही झुंबर किणकिण हलता झुलताभगवंताच्या मोक्षपथाचा वसा जपावा वेळोवेळी मुनी दिगंबर उभे ठाकता पूज्यपाद ते स्मरुन अंतरीदर्शन घेता भाव भक्तीचा उचंबळावा वेळोवेळी नाव गाव पर्याय वेगळा असो आत्मिया.. अर्घ्य…
-
काय टाकू – KAY TAKU
-
घटाव – GHATAAV
आत्मप्रदेशी तरंगणारा तणाव माझासबब अहिंसेकडेच आहे झुकाव माझा मणी असूदे अथवा पाते दांड्याविन तेघुसळण होण्या पृष्ठावरती दबाव माझा घाटदारला शब्द बोलिचा घटाव सुंदरअर्थ काढणे स्वतःस हितकर सराव माझा शोध मुमुक्षु मणी तळी जो रुतून बसलाअज्ञानी मूढांना लागे न ठाव माझा काकडारती केका घन्टा बांग नमोस्तूशुभ भावांच्या भरतीमधुनी उठाव माझा
-
ओळख – OLAKH
-
हालदारी – HAALDARI
-
फुलमाला – FUL MALAA
घे विश्रांती करे विनंती जलदाला पृथ्वीघे म्हणते मम माळ कुंतली फुलमाला पृथ्वी वेषांतर करुनी नित सृष्टी नक्षत्रे उधळीघेय म्हणे खांद्यावर कम्बल वाऱ्याला पृथ्वी रत्नकम्बला मी का द्यावे म्हणता शिरोमणीघे रत्नत्रय म्हणे क्षमावणि इंद्राला पृथ्वी कशास मस्ती सांग दुजांच्या जीवावर जीवाघे व्रत सुंदर कानी सांगे जीवाला पृथ्वी पद्मावती जिनशासन देवी पारसनाथाचीघे वीणा पुस्तक हाती तव वनमाला…