Category: marathi kavya

  • बुदू बुदु – BUDOO BUDOO (fast fast)

    काय कशाला कुठे कसे ? पुसू नको तू प्रश्न असे! हवे तुला जर उत्तर रे, कशास अर्धे प्रश्न बरे? पूर्ण वाक्य तू जुळव बघू; हसेल उत्तर खुदु खुदु! मिटतिल शंका बुदू बुदु…

  • माघार शक्य नाही – MAGHAR SHAKYA NAHI (no turning back)

    जिंकेन सर्व हृदये माघार शक्य नाही शिखरावरी उभी मी पडणार शक्य नाही मिळवेन सर्व सौख्ये खेचून सर्व तारा सध्यातरी इथूनी हलणार शक्य नाही परिघावरी कसेही फिरती अनेक शत्रू केंद्रातुनी कधीही ढळणार शक्य नाही मजबूत पकड माझी आसावरी अशीकी उडतो पतंग वेगे कटणार शक्य नाही दृष्टीस धार इतुकी कापेल दुष्ट नजरा अश्रू अमोल माझे झरणार शक्य…

  • जाण तू – JAN TU (“you figure it out”)

    आत्मघाती संस्कृतीचा कळस खोटा जाण तू सुंदरांच्या प्रकृतीचा पाय सोटा जाण तू संधिसाधू बेरकी ते अक्षरांना बदलती मस्त त्यांना ठोक द्याया काव्य गोटा जाण तू मंदिरे ते बांधताती फायदा लाटावया संत बनुनी कमवणे हा पुण्य तोटा जाण तू मोडण्या लग्ने तयांचा कुंडलीचा फार्स हा गूण मग जुळवीत बसण्या मोज नोटा जाण तू हाच मोठा मीच…

  • अंनिस – ANDHSHRADHA NIRMULAN SAMITI (blind faith eradication committee)

    विचार अमुचा आहे पक्का म्हणते अंनिस उठेल पेटुन मानव सच्चा म्हणते अंनिस नकोत शस्त्रे जिंकू युद्धे बाहुबलाने अभय व्हावया बालक बच्चा म्हणते अंनिस बंधुत्वाची ज्योत तेवण्या दृष्टी देण्या दादा भैय्या भाऊ अण्णा म्हणते अंनिस हत्या करुनी भ्याड पळाले तोंड लपवुनी निसर्ग त्यांना देइल धक्का म्हणते अंनिस विज्ञानाचे मर्म जाणुनी शास्त्र जाण रे कर श्रद्धेचा पाया…

  • निश्चय अमुचा – NISHCHAY AMUCHA (our determination)

    भयास जाळू निश्चय अमुचा नाती जोडू निश्चय अमुचा मायाचारी कपट वक्रता उखडुन टाकू निश्चय अमुचा परम अहिंसा धर्म सुखाचा हिंसा त्यागू निश्चय अमुचा जीव जपूया मने जपूया बकबक टाळू निश्चय अमुचा हवे कशाला नाटक जगण्या खऱ्यास माळू निश्चय अमुचा मात्रा-सोळा=(आठ+आठ), १६=८+८.

  • पावश्या घूम – PAVASHYA (brainfeverbird)

    घूम घूम पावश्या चारा देती मावश्या चारा आहे मऊ पाऊस तुझा भाऊ ये रे ये रे भावा भाषा शीक जावा भाऊ शिकला भाषा पणजा गुंडाळी गाषा…

  • शिशिर ऋतू – SHISHIR RUTU (winter season)

    शिशिर ऋतू मी शिशिर ऋतू मम ह्रदयाचे पाच ऋतू घर बर्फाचे बांधुन मी तयात बघतो राहुन मी कधी झोपतो निवांत मी म्हणत वसंत ये ये तू संगे त्याच्या बागडतो वठली खोडे पालवतो वाद्ये मंजुळ वाजवतो ग्रीष्मासंगे जात उतू कुंकुम वर्णी निसर्ग हा हिरवाईने नटे धरा खाउन आंबे फणस गरा म्हणतो वर्षे कोसळ तू मीच धबधबा…