Category: Marathi sahitya

  • पटोला – PATOLAA

    अबोली पटोला भरजरी पटोला नवलखे अलिकुले किनारी पटोला न घोला न अंचल निळाई पटोला गझल गझलियत स्वर जपावी पटोला गडद कुंकवासम शबाबी पटोला सळसळे शिवारी बहारी पटोला कनक जोडव्यांची नव्हाळी पटोला उन्हाळी फुलांची हळदुली पटोला हरित पल्लवीची मखमली पटोला निसुन्दी मनावर मुरुकुला पटोला न विंजन न वारा भरारी पटोला तराया तरोहण तराफी पटोला स्वरूनादबिंदे समाही…

  • अणू – ANOO

    तुझी वासना ठेव तुज जवळ तू निजी कामना भावना कवळ तू कराया निवाडा स्वतः साक्ष हो जुनी जीर्ण वस्त्रे पुरी सवळ तू न कोप करता शिकत जावे बरे उन्हाने तपव देह मथ खवळ तू कळाया तुला सर्व पर मोह तो उकळ मौन द्रव्ये तळा ढवळ तू गुरा वासरांना चरायास ने बसूनी दुपारी चऱ्हाट वळ तू…

  • राजकन्या – RAJ KANYA

    मुक्तक … प्रेमासाठी ती आसुसली ..एक राजकन्या प्रीतीच्या स्पर्शाने उठली …एक राजकन्या स्पर्शालाही महाग केले ..धर्म कसा वैरी माणुसकी जपणारी असली …एक राजकन्या मुक्तक… पाऊस जोगव्याचा सर जोगव्यात न्हाली शांतीत रंग भिजले सर लाडवात न्हाली हंडे भरून सांडे सुख कोवळ्या उन्हाचे ओतून धान्यराशी सर सांडव्यात न्हाली

  • अढळ सत्य – ADHAL SATYA

    मुक्तक… वाहून गेले डोळ्यामधून सारे खारे पाणी काळीज सांगे सुकले तपून खारे सारे पाणी गागा लगागा गागा लगालगा गा गागा गागा ओळख सुनेत्रा माझी लगावली झरणारे पाणी मुक्तक … थरथरे भूमी गव्हाळी रंगलेली गोठली थंडी सकाळी रंगलेली वाहने धावून थकली वळण येता धूळ त्यांवर पावसाळी रंगलेली चारोळी … सत्य युगाची अखेर हे तर वाक्य चुकीचे…

  • वेढणी – VEDHANI

    वळे वेढणी शुद्ध हेम मम पीळ अंतरी तुझी वारिया घुमत राहुदे शीळ अंतरी बिंब म्हणूकी भास धुक्याचा भाषेवरती हृदय जलावर फिकुटलेली नीळ अंतरी जरी कळीचा नारद कोणी कळ उघडाया कळा कलेच्या कुणास भावा खीळ अंतरी किती ग सुंदर शील तुझे हे झरझरणारे दृष्ट न लागो सबब तीट हा तीळ अंतरी जाण तीन रत्नांची महती खाण…

  • विरासत – VIRASAT

    उडवित रंगा अवखळ दंगा कशास पंगा गझल बाई मी कट्यार नंगी झळकत अंगी तळपत जंगी नवल बाई मी मातृ पितृ मम धर्म प्रिय खरा कमळ फुलांचे सुटूदे सत्त्वर अनवट कोडे पायी जोडे करात तोडे तरल बाई मी लीड घेतले सन्मानाने जगण्यासाठी वाण वसा जैन जिनवर अंबर शिवमय सुंदर सत्य धरोहर सरल बाई मी गरगर फिरती…

  • नोंदणी – NONDANI

    विसरतेस जेव्हा कधी ओढणी तू रुमालास करतेस जल गाळणी तू पुरे जाहल्या चौकशा पोलिसी रे तपासून घ्यावी प्रुफे नोंदणी तू जुन्या पुस्तकांना पुन्हा चाळ थोडे कळायास संदर्भ झटक मांडणी तू घरातील खोल्या कवाडे किती ते जरा लक्ष घालून खडा हो झणी तू सुनेत्रा तुझे दोष गुण ओळखूनी स्वतः हो स्वतःची खरी चाळणी तू