Category: Marathi sahitya

  • आक्रीत – IMPROBABLE

    आक्रीत काय घडले आवाज बंद म्हणता कोडे कुणास पडले आवाज बंद म्हणता पिवळे गुलाब खुडुनी जे जे पसार झाले भवरोग त्यांस जडले आवाज बंद म्हणता ऐकून शब्द प्रीती बुडुनी भ्रमात फुगता शिशिरात ढोंग झडले आवाज बंद म्हणता बोलावयास त्यांना उरलेय काय आता मौनात भाव दडले आवाज बंद म्हणता स्मरले मला न काही कारण कळावयाला वाटेस…

  • मनोरा – Tower

    गळ्यात घालुन गळा डहाळी अक्षत पानांची उधळे फुलांस कोमल खुडून अलगद अक्षत कुसुमांची उधळे सरोवरातिल नीर सुगंधित हरित टेकडी हवा खुली उंच मनोरा बिंबावरती अक्षत नाण्यांची उधळे हूड निर्झरासंगे वारा खेळ खेळतो लपाछपी सूप उडवुनी हातांमधले अक्षत धानांची उधळे कार्तिकातली शुद्ध प्रतिपदा दिवे लावुनी आकाशी अग्निपुष्प फिरवून गरगरा अक्षत ठिणग्यांची उधळे कोर बिजेची भाळावरती रेखुन…

  • अलबत – “of course”

    अश्विन मासी पाऊसधारा भिजवून गेल्या अवघ्या राना ईशान्य मोसमी परतीचा पाऊस भाऊ धरतीचा पाणीच पाणी झरझरते निर्झरातुनी खळखळते दुहितेमधुनी झुळझुळते समुद्र भरती उधाणते ……..दीपावली पावन मंगलमय गाती  झाडे वेली जय जय सुखद गारवा सुखावते सय ओळ दिव्यांची काय सांगते मोक्षलक्षुमी पूजन करुनी रत्नत्रय धन जिवा लाभते नूतन वीर निर्वाण संवत स्वागतास मी आहे अलबत

  • इरसाल – Of the richest flavour

    ना..जुक धक्का लहरी.. हवेचा .. हिंदोळते तन मन पान गाते जाळी कशी रेखून साजुक … आकाश आभाळ भरण्यास येते… … … नाजुक धक्का लहरी हवेचा पाऊस धार ..मुसळासमान ओतून हंडे थकली न बाई पहाटे ..पहाटे ..निजली जराशी नाजुक धक्का देऊन जलदांस पुन्हा सकाळी उठली धुवाया धरणे नि जोहड ..टाक्या नि मोऱ्या .. शेवाळलेल्या …भंजाळलेल्या ……

  • करंजी – KARANJI

    सूर्य उगवता हळदी तांबुस सोन्याचा गोळा भाव ठरव तू स्वतः स्वतःचा तोलण्यास तोळा उचल करंजी डब्यात भर तिज जा जा शाळेला लगावलीच्या मोजुन मात्रा लगा लगा सोळा दप्तर डोई करात लाठी चालव वेळेला नको जवळ पण करू कुणाला जरी दिसे भोळा वाटिकेतला सुगंध लुटण्या भृंगांचा फेरा ना परवाना करण्यासाठी फुल चोळामोळा कुटीत पंचम मुनी दिगम्बर…

  • पाळणा – Cradle

    हवा जादुई .. झुले पाळणा पानांचा हिरव्या .. फांदीवर झुलणारे झुमके जर्द लाल पाकळ्या….. दगड विटांशी पाचोळ्याशी करण्या गुजगोष्टी .. चिवचवणारी रानपाखरे भवताली उडती….. दूरदूरवर आगीनगाडी झुकझुक धावत जाई .. गतकाळातील सुखद स्मृतींची मनात गर्दी होई ….. निसर्गातल्या सदैव जागृत जिनशासन देवता.. पंचमहाभूतांसह जपण्यासाठी लय ताल जीवनाचा….. नवरंगांची सप्तस्वरांची करतात साधना भुंगे .. सूर ताल…

  • ओज – PROWESS

    पायऱ्यांना कोण मोजे रोज आता लिफ्टला मी सांगते तू मोज आता बाळ ते नादान आहे जाण मर्दा नित्य उडवे खेळण्याचे नोज आता रोज कुठला साजरा करण्यास नुरला डे नवा पुन्हा नव्याने खोज आता टेकडीवर रानवाटा भावणाऱ्या चढत जाणे वाटते ना बोज आता श्वास घेता या हवेतिल प्राणवायू भरत जाई अंतरी मम ओज आता पाठ माझी…