Category: Marathi sahitya

  • झरोके – ZAROKE (SMALL WINDOWS)

    Zaroke(झरोके) means small windows. उघडून दाव त्यांना गीतातले झरोके झाकू नकोस आता हृदयातले झरोके तोडेन तारकांना दिवसा उजेड असता उल्केस दावण्या मी गगनातले झरोके या माणसातसुद्धा असती लबाड कोल्हे शोधा तुम्ही तयांच्या डोळ्यातले झरोके अलवार गझल माझी हलकेच कंप पावे श्वासातुनी खुलावे शब्दातले झरोके पाण्यात पेटलेले प्रतिबिंब हासणारे तव लोचने ‘सुनेत्रा’ बिंबातले झरोके वृत्त- गा…

  • काय लिहू मी – KAAY LIHOO MEE (WHAT WILL I WRITE)

    सांग मायना काय लिहू मी पुत्र लेक की माय लिहू मी कुंडी मधल्या वटवृक्षावर विशाल की बोन्साय लिहू मी मैत्र जिवांचे व्यक्त कराया नमस्कार की हाय लिहू मी गझलेच्या भाळावर शीर्षक क्षीर लिहू की साय लिहू मी प्रीत कळीला शब्द समर्पक मुग्ध खरा की शाय लिहू मी तलफ यावया गझलेसाठी चहा पिऊकी चाय लिहू मी…

  • फाइट फाइट – FIGHT FIGHT

    In this Ghazal the poetess uses various words which have different meaning in Marathi and English language. These special words are used as radif in this Ghazal. प्रकाश, हलका, लाइट लाइट! लिही, बरोबर, राइट राइट! वाऱ्यासंगे, हवेत उडतो; पतंग माझा, काइट काइट! बूच असे मी, घट्ट लावले; गच्च म्हणा वा,टाइट टाइट! रातराणिची, प्रिय सखी ही;…

  • माझे मला न कळले – MAAZE MALAA N KALALE (EVEN I DON’T KNOW)

    This Ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. This Ghazal describes state of mind in various situations. माझे मला न कळले का वागले असे मी गझलेतल्या नशेला का भाजले असे मी जोडून प्रेम धागे सारे जुने पुराणे त्या चाळणीत काटे…

  • सरदार – SARDAAR (BRAVE WARRIOR)

    In this Ghazal the poetess describes behaviour of brave people who fight madly to achieve their goal. सरदार शूर वीर नाही वेडा पीर धवल टापशी शिरी करी कामठा तीर तहानलेल्या जिवा दे दे शीतल नीर तिखट मिंग्रजी दवा वाघीणीचे क्षीर त्रिशुल गवसता मला बळकट झाला धीर गझल म्हणा वा गझलि अथवा कुर्मा खीर

  • गाणे – GAANE (SONG)

    गाते अता तराणे सुरेल दिडदा दिडदा भिजणार बघ सुखाने सुरेल दिडदा दिडदा लय सूर ताल यांची मैफल सुरेख जमता गाणार मस्त गाणे सुरेल दिडदा दिडदा

  • जप जप – JAP JAP (CHANTING)

    This poem is a short poem containing only five lines. जप जप जपता माळ जपाची, तप तप करता बाग फुलांची, उन्हात तापुन फुले झळकली! घड द्राक्षांचा तुटून पडला, द्राक्ष मण्यांनी ओंजळ भरली!!