-
बोणी – BONEE
हिडीस चाळे करता कोणी का लावू मी कुणास लोणी मम गझलांनी भरली पोती डांसांची जड उचला गोणी रत्नत्रय हृदयात वसाया दशलक्षण सोपान त्रिकोणी पेरूवाली आली दारी दे चिल्लर अन कर तू बोणी सोनु सुनेत्रा गुण सोनेरी काहीही लिव सोनी सोणी
-
बहिणी – BAHINEE
बहिणी खरेच सच्च्या भावांस जागणाऱ्या लावून अर्थ हितकर नावांस जागणाऱ्या जेथे न फक्त चर्चा चारित्र्य पूजिती त्या ओढाळ अंतरीच्या गावांस जागणाऱ्या मांडून चूल दगडी मी भाकऱ्यांस थापे घन तापल्या तव्यांच्या तावांस जागणाऱ्या जे घाव तू दिले मज भरुनी तयांत सौरभ फुलती कळ्या सुगंधी घावांस जागणाऱ्या जिंकावयास हृदये उधळू सयी सुनेत्रा मागून घेतलेल्या डावांस जागणाऱ्या
-
कडप्पा – KADAPPAA
प्रीतीने भर भर ओटी वंदन दुहिते शत कोटी संथ वाहते संत मती नितळ वाहती नीर गती कांचन पाचूच्या मखरी पदर भरजरी निळी निरी काष्ठ स्तंभ दो कळस शिरी हिरवळ भूवर मुक्त सरी मुखचंद्रावर तेजस्वी भाव मनोहर ओजस्वी सरळ नासिका कृष्ण कळी काया झळझळ सोनसळी काळ कडप्पा उंबरठा मित्र जिवाचा पाणवठा सजल नेत्र घन भाव पहा…
-
ओटी – OTI
मंगलमय मन संथ सावळी कृष्णामाई तू ग्रामस्थांची कुलस्वामिनी कृष्णामाई तू अष्टक देण्या भावफुलांनी कुमारिका आल्या प्रीतीने भर निसर्ग ओटी कृष्णामाई तू गवार भेंडी खिरा काकडी रक्तिमा साखरी कलिंगडातिल सत्त्व राखशी कृष्णामाई तू मुळा मुठा पवना कावेरी इंद्रायणी कऱ्हा गंगा नीरा झेलम तापी कृष्णामाई तू डोंगरातले निर्झर झरती बावखोल भरती मुक्त गझाला अभयारण्यी कृष्णामाई तू घटप्रभा…
-
पट – PAT
भावात देव आहे शोधा कुठे कपट ते आत्म्यास साक्ष ठेवा शोधा कपाट पट ते हिरव्यात कृष्ण धवला राखाडि लाल पिवळा चौकट बदाम किल्वर इस्पीक चार पट ते मम खेळ बिनपटाचा भासे जरी जनांना तत्त्वार्थ सूत्र खेळी जीवाजिवास पटते चाफ्यासमान सोने हळदीसमान औषध आराधनेत तपुनी होईल काळपट ते शेरात पाचव्या लिहितेय नाव माझे मांजापरी सुनेत्रा सत्यास…
-
जेव – JEV
शंका कशास कुठली निजभाव देव आहे शुद्धोपयोग जपणे ना देवघेव आहे पाऊल टाक पुढती रस्ता मिळेल सच्चा आत्म्यावरीच श्रद्धा कसले न भेव आहे चकली अनारशांचा दरवळ पिते रसोई रंगीत हे चिरोटे दुरडीत शेव आहे गाळून घाम जेव्हां होते कधी भुकेली रसनेंद्रियांस सुखवे तो शब्द जेव आहे जो तो जरी म्हणे मज ऐसीच तव तऱ्हा ही…
-
शबाब – SHABAAB
अंकात ना अडकते अक्षर शबाब होते मी आकडे न मोजे मौनी गुलाब होते कुठल्याच पुस्तकांचे माझे दुकान नाही माझी दुकानदारी माझा रुबाब होते अन्नास ठेव झाकुन होताच गार अलगद राहील ते टिकूनी ना ते खराब होते तो ब्रम्हदेश अस्सल माझाच वाटता मज चित्रात कृष्ण धवला रंगून बाब होते आहेच मी सुनेत्रा मम क्षात्रतेज तळपे मेयर…