Category: Marathi sahitya

  • उपादान – UPADAAN(FACTOR)

    मुक्तक ..गोळे गोळे कसले हे तर डोळे आग ओकणाऱ्या तोफांचे छायाचित्रांमधून वर्षें जणू बरसती घन ठिणग्यांचे कानगोष्ट ती मम जीवाची विसरुन जाण्या मंत्र ‘सुनेत्रा’ एक घालते ऐकच पात्रा ताम्राषाढी नक्षत्रांचे रुबाई ..उपादान उपादान तर अंतर्यामी निमित्त काया कर्मांचे बंधास्रव पण पापपुण्य घन भावभावना कर्मांचे रुबाईत दो शेर स्वयंभू वेगवेगळे बीज जीव अक्षरमोती पेर स्वयंभू वेगवेगळे…

  • लाडू – LAADOO(BALL SHAPED INDIAN SWEET)

    डिंकाचे मी खाईन लाडू हक्काने मी खाईन लाडू दाबत फिरवत वळून झेलून हाताने मी खाईन लाडू राजगिरा चुरमूरे चण्यांसह लाह्यांचे मी खाईन लाडू लिच्ची पेरू चेरी जांभूळ बोरांचे मी खाईन लाडू दुःख न उरले बाकी ‘सुनेत्रा’ बुंदीचे मी खाईन लाडू

  • पावन भाषा – HOLY LANGUAGE

    धार असो आधार असूदे गप्पांसाठी पार असूदे घरात भवती हवा खेळती खिडक्या उघडे दार असूदे जीव जगाया मंत्र जपाया णमोकार नवकार असूदे तप्त दुपारी निवांत खाण्या हाती गारेगार असूदे शुभ मंगलमय पावन भाषा कुठलाही मग वार असूदे पंच परमपद अक्षर मोती कंठी त्यांचा हार असूदे मक्त्यामधले नाव ‘सुनेत्रा’ कधीच ना लाचार असूदे

  • तूळ – WEIGHER

    चूळ ईश्वरी मूळ ईश्वरी रत्नत्रयमय सूळ ईश्वरी नवरंगांची धूळ ईश्वरी गोत्र धर्म मन कूळ ईश्वरी येशूचा तो सूळ ईश्वरी न्याय अंतरी तूळ ईश्वरी पुण्यपाप ढ-ग ढूळ ईश्वरी दोन समांतर रूळ ईश्वरी ऊस ‘सुनेत्रा’ गूळ ईश्वरी

  • सती – VIRTUOUS WOMAN

    झळझळीत प्रकृती संस्कृती पारस पद्मावती संस्कृती धरणीधर शासन देवांची पूर्ण सिद्धता मती संस्कृती संस्क्रित संस्कृत वैय्याकरणी ग्रामर ग्राहक गती संस्कृती सहज लीलया बोल इंग्रजी माय मऱ्हाटी जिती संस्कृती आजी माजी भावी शोभे जैन ‘सुनेत्रा’ सती संस्कृती

  • ऊ – HEAD LICE

    नवे पेन मी पुट पुटस्फुट गेट केन मी पुटपुटस्फुट मराठीत बोलू पटपट लेनदेन मी पुट पुट स्फुट केस मराठी अव्वल ऊ लीख हेन मी पुटपुट स्फुट होंडा फटफट पद बुलेट कार झेन मी पुटपुट स्फुट दशग्रंथी नच दशधर्मी दहा टेन मी पुटपुट स्फुट व्याज फायदा बड्डी रे लाभ गेन मी पुटपुटस्फुट दुष्ट ‘सुनेत्रा’ येन केन…

  • झळा – HOT WINDS

    मखमल जणु पाकळ्या फुलांच्या गुलबक्षी रोवळ्या फुलांच्या जांभुळलेल्या झळा शबाबी लाजाळू साखळ्या फुलांच्या अंगरखा मलमली उन्हासम गप्पा मनमोकळ्या फुलांच्या काजळभर दाटुनी पसरल्या आठवणी सावळ्या फुलांच्या दवभरल्या पापण्या सुनेत्रा पैस कळ्या झावळ्या फुलांच्या