-
प्रतोद – PRATOD (HUNTER)
रथावरी सारथी करी मी कडाड उडवित प्रतोद आहे सुटावया छिडकत्या जिवांना गती जयांची निगोद आहे मला न भावे हसुन हसविण्या कुटील रोगी टवाळ वृत्ती लयीत येता भाव पकडतो सहज निखळ मम विनोद आहे फुकाच भाषा अता तहाची टळून गेली जुनाट घटिका नवीन स्वप्ने पुरी कराया भरारणारा प्रमोद आहे कशास तारा उगाच छेडू घनी विजेच्या अश्या…
-
काळाला ना घाबरते – KALALA NA GHABARTE (DOES NOT FEAR TIME)
-
क़िस्त -KIST (INSTALLMENT)
-
पृथ्वी – EARTH ( MARATHI ARTICLE)
EARTH म्हणजे पृथ्वी. अर्थ म्हणजे वित्त…धन संपत्ती. अर्थ सांगणे म्हणजे, शब्दातून वाक्यातून स्वतःने जे काही जाणले ते विशद करून सांगणे,लिहिणे… अर्थ म्हणजे आत्मासुद्धा ! शब्दाला अर्थ असतो, वाक्यालाही अर्थ असतो. अर्थाचाही एक अर्थ असतो… अक्षरे, शब्द आणि वाक्ये तर पुद्गल असतात…मग पुद्गलांत आत्मा असतो काय… कविमनाची व्यक्ती, एखादी जिवंत व्यक्ती जेव्हा उस्फुर्तपणे किंवा विचारपूर्वक काही…
-
सम्यक शेती – SAMYAK SHETEE (COMPLETE AGRICULTURE)
छेडते न वीणेच्या तारा गाण्यासाठी गाण्यासाठी शीळ घालता सुरभित वारा गाण्यासाठी गाण्यासाठी तबला पेटी हवी कशाला साथीला मम ढग आणिक खग जलदांमधल्या झेलिन धारा गाण्यासाठी गाण्यासाठी ताडमाड नारळी पोफळी गगन चुंबिती गातो निर्झर खुणावतो आसमंत सारा गाण्यासाठी गाण्यासाठी तापतापुनी धरा जलाशय ढगोढगी बाष्पाची दाटी वाफेचा उतरूदे पारा गाण्यासाठी गाण्यासाठी रान जिवाचे करून फुलविन सम्यक शेती…
-
नुक्ता – NUKTAA (DOT)
हिंदी उर्दू ग़ज़लेमध्ये नुक्ता भारी मराठीतला शब्द स्वस्त मग सस्ता भारी गज्जल झाली गजल गज़ल अन गझल शेवटी या नावास्तव काढल्यात मी खस्ता भारी लगीनघाई खरीखुरी ही आली बाई गझलदालनी काढ भरजरी बस्ता भारी रम्य हवेली माझी आहे तिथे जातसे वळणावळणाचा गाणारा रस्ता भारी तिरंग्यातल्या रंगी बुडवुन इथे सुनेत्रा फिरव लेखणी सहज उमटण्या मक्ता भारी
-
टाळी – TAALHEE (HANDCLAP)
डोळ्यांत आसवांची आली भरून घागर अन पापण्यांत स्वप्ने जगली झरून घागर भरुनी पुन्हा पुन्हा ती करते रिती स्वतःला झाल्यावरी रिकामी येते तरून घागर पश्चिम झळाळणारी तांब्यापरी बघूनी मज माय पाठवीते छोटी घरून घागर मम घागरीत सागर आहे मधुर जलाचा मी रम्य घाट चाले डोई धरून घागर घन तापताप तपुनी देता विजेस टाळी सांजेस मेघमाला ओते…