Category: Marathi sahitya

  • गझनीत – GAZNEET (POEM WHICH IS GHAZAL AND SONNET TOO)

    सुरभीतराई हळद माखुनी कनकलता भासे गिरवून मात्रा जलद सावळ्या सलिलसुता भासे अडवून वाऱ्या गडद रांगड्या सळसळता पर्णे समशेरधारी रजत दामिनी रण दुहिता भासे कदली दलांच्या हरित मांडवी अनवट कोड्यांनी लय सूर ताली भरुन सांडण्या घट हलता भासे वसने दिशांची घन निळे धुके मलमल बाष्पाची विखरून देता किरण तांबडा कलश रिता भासे पिवळ्या जमीनी कुरण जांभळे…

  • माझे सॉनेट – MAAZE SONNET (SONNET WHICH I WROTE)

    आम्ही मेघ सावळे दाटता नभी अश्वांवर बसूनी झिंगतो वात हूड वीज आसूड घुमवी कडकडा उधळतात अश्व चौखूर आम्ही कोसळू धडधडा कडा ओतेल मौक्तिके शुभहस्ते ओंजळीत भरूनी धनधान्य पिकवतील ग्रामस्थ नीरास वळवूनी भागवू तहान धरणांची सांडू लोळून गडगडा व्हावयास बाष्प हलके तापून उकळू तडतडा लहरण्या मुक्त विहरण्या मोदे वर जाऊ उडूनी अदृश्य होऊन फिरू तारांगणी नक्षत्रफुले…

  • झबक – ZABAK (RACEME)

    सत्ताविस मात्रात बांधली सुबक रुबाई खास पूजन करण्या मीच सजविले तबक रुबाई खास ब्रह्मांडातिल जीवजीवांना हिचेच वेड नि ध्यास सृष्टि सुनेत्रा सुंदर बाई झबक रुबाई खास

  • फाल्गुन सरी – FAALGUN SAREE (RAIN IN FALGUN MONTH)

    फाल्गुन मासी रिमझिमणाऱ्या झरती पाऊससरी झरती पाऊससरी …. आभाळाच्या आल्या पोरी नाचत धरेवरी नाचत धरेवरी… रिमझिम पाऊससरी धरेवर आल्या पाऊससरी … भिजले अंगण भिजल्या वाटा भिजल्या चिंब सरी भिजल्या चिंब सरी … पहाटेस कुणी कचरावेचक चाले रस्त्यावरी चाले रस्त्यावरी …. उचलून कचरा सारा सारा घरचा रस्ता धरी… घरचा रस्ता धरी … वर्दळ वाढत जाई हळुहळु…

  • तीर्थंकर चरण – TEERTHANKAR CHARAN (DIVINE FEET)

    आदिनाथ तीर्थंकर पहिला चरण तळी ऋषभ अजितनाथ तीर्थंकर दुसरा चरण तळी गजराज संभवजी तीर्थंकर तिसरा चरण तळी अश्व अभिनंदन तीर्थंकर चौथा वानर चरण तळी सुमति जिन तीर्थंकर पंचम चकवा चरण तळी पद्मप्रभू तीर्थंकर षष्ठम लोटस चरण तळी सुपार्श्व जिन तीर्थंकर सप्तम स्वस्तिक चरण तळी चंद्रप्रभू तीर्थंकर अष्टम चंद्रकोर चरणी पुष्पदंत तीर्थंकर नववा चरण तळी मगर…

  • जुहू – JUHOO (SEA SHORE IN MUMBAI)

    काय लिहू कुठे लिहू, कसे लिहू अन किती लिहू.. गुणगुणते पाखडते, सुपातुनी सांडती गहू… गीत नवे भजन नवे, गा गा म्हणता गझल मला.. उदुंबरीं गातो रे, कोकिळ मी मग कुहू कुहू… तू अन मी मी अन तू, हवा खावया मुंबईत.. चल जाऊ फिरावया, चौपाटीवर मस्त जुहू.. खरेखुरे जगणारे, मरणारे बहू झालेत .. लढावया भू साठी,…

  • अक्षर मोती – AKSHAR MOTEE (PEARLS OF LETTERS)

    नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल फुलपाखरासम उडायाला विणावी छान मी गझल उडून उडून दमल्यावरती चित्रात रेखण्या तिला चिमटीत सान पकडुन पंख धरावी छान मी गझल अंगणातल्या दोरीवरती वाऱ्यात सुकवायाला बुडवून वाहत्या निर्झरात पिळावी छान मी गझल भूचक्रासम गरगर फिरण्या तेलात सोडून उष्ण तांबूस लाल खुलाया रंग तळावी छान मी गझल झुळझुळ पहाट वाऱ्यासंगे…