Category: Marathi sahitya

  • कोण कितीजण – KON KITEEJAN

    मुक्तक … कोण कोण पडत्यात कळले बाई कोण रडत्यात कळले बाई मी कश्याला रडावे सांगा कोण सडत्यात कळले बाई गझल .. कितीजण कोण पळाले कळले कळले कोण कसाई टळले कळले गा गा ल ल गा म्हणत राहता कोण बरे हळहळळे कळले रंगवलेल्या वाड्यामध्ये कोण कितीजण चळले कळले बात कशाला सांगू कसली कोण जुगारी ढळले कळले…

  • किल्ली – KILLEE

    हात असावे कुणीतरी ज्ञात असावे कुणीतरी विडा त्रयोदश गुणी खरा कात असावे कुणीतरी दिवा तेवण्या तेल झरे वात असावे कुणीतरी जरी आजचा शुभ दिन पण रात असावे कुणीतरी गुलाब किल्ली जपावया जात असावे कुणीतरी चिंब व्हावया शांत रसे न्हात असावे कुणीतरी सयी ‘सुनेत्रा’ मृदगंधी तात असावे कुणीतरी जपावया

  • उठाठेव – UTHATHEV

    फुकट नसावी उठाठेव ही विकत असावी उठाठेव ही आत्महिताला जपत उमटली मनी ठसावी उठाठेव ही अहं जयाने फुका पोसला त्यास लसावी उठाठेव ही तुझीच नांगी तुझी वासना तुला डसावी उठाठेव ही नागिण सळसळ करत लहरता गात हसावी उठाठेव ही जरी उतरली नशा नाचरी परत कसावी उठाठेव ही हृदय जलाच्या तळी मंदिरी शांत वसावी उठाठेव ही…

  • भावबंध – BHAV BANDH

    काकडारतीला दाटे .. बनी केतकी सुगंध रेशमाच्या धाग्यांसवे .. जुळावया भावबंध झरे पाऊस आषाढी .. जीव अजीवाचा बंध गाठणीला चार दाणे .. रुजावया मृदा गंध आस्त्रवाला पंचभूते .. शेत साळीचे डोलते संवराला निर्जरेला .. मोक्ष तत्त्व एकसंध झाला खरा आरंभ रे .. सत्य युगाचा न अंत भक्त पूर्ण जागा झाला .. तडकूनी न्याय अंध देह…

  • सनत – SANAT

    मम गोष्ट धोतऱ्याची देताच परत काही त्यातील अर्थ कळण्या बसतात कुटत काही झालेत संत सन्तच आघात’स’वर करूनी जपण्या अलामतीला लिहितात सनत काही मिळताच अर्थ’सा’ला ‘रे’ला जसा दिलेला गझलेस गज्जलेची म्हणतात सवत काही ते पान धोतराचे जोडीतले धुवोनी गाळून उदक घेता जळतात धुपत काही पानांत शोभणारे मृदु पुष्प धोतऱ्याचे चाखावया विषाला फिरतात घुमत काही कोणास गंड…

  • मन सुंदर – MAN SUNDAR

    मुक्तक … मन समजू नये कधीही गाणे उदासवाणे मन मोद वर्तमानी गाता भरून जाणे उस्फूर्त चार ओळी गाऊन हृदय भरता कळ अंतरी सुखाची ओढू नकाच घाणे मुक्तक …सुंदर अपुला आत्मा सुंदर साधा अंतर म्हणते अंतर साधा गा गा गा गा गा गा गा गा लल गा गा ल ल मंतर साधा

  • कर्तव्य – KARTVYA

    राजाचे कर्तव्यच लढणे पण भाटाचे गात राहणे पीत गुलाबी पाच पाकळ्या जलबिंदूंनी सजल्या भिजल्या उभी पाठीशी हिरवी पाने कळ्या किरमिजी भिजले गाणे भिजता गाणे वारा अवखळ वाहू लागतो झुळझुळ सळसळ सुगंध भिजला वाहून नेतो प्रीत फुलांची पेरून येतो