Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • नमाज – NAMAAJ(RITUAL PRAYER)

    न माज माझा नमाज सा रे णमो तथास्तु णमोच गा रे च नच भरीचा जाणशील तू असो रुबाई मुक्तक तारे शील शोधण्या नको भ्रमंती शोध स्वतःतच पिऊन वारे शेर मस्त हा चतुर्थ स्थानी छानच शोभे म्हणती सारे गझल पूर्ण मम सार्थ सुनेत्रा उन्हात तपता जळले भारे

    December 27, 2023
  • प्रहार – PRAHAR(THUMP)

    धुके कपोती हवा गुलाबी निहार आहे शिशिर ऋतू पण बनी शराबी बहार आहे दवाळ बागा उले फुले केवडा सुगंधी परिमल कैदी कळी शबाबी तिहार आहे किती जरी घन तुझी लबाडी कुटील कपटी तुज उडवाया हजरजबाबी प्रहार आहे तडाग भूवर गडद निळे जल दलात मिटल्या.. सजीव स्वप्ने दिवाण काबी न हार आहे नवीन क्षुल्लक जिनागमातिल गझल…

    December 27, 2023
  • कुरल सृष्टी – KURAL SRUSHTEE(CLASSIC TAMIL ETHICAL TEXT)

    रंगली मेंदीत भिजुनी गार हिरवी गझल सृष्टी बिल्वरी सोन्यात झळके ताम्र तांबुस धवल सृष्टी लेखणीने मी खणे ती अक्षरांची खाण आहे हरघडी लयलूट करण्या वर्णमाला नवल सृष्टी वाट वळणाची जरी ही पावलांना साथ देते जिनस्तुतीमय काव्य तिरुवल्लूवरांची कुरल सृष्टी गच्च आभाळी कडाडत वीज भेदे जलद भारी कोसळे पाऊस धो धो प्राशुनी जल सजल सृष्टी नीर…

    December 20, 2023
  • सबूत – SABOOT(WITNESS)

    कता .. पथ्य पाळता कळते तथ्य जिवा तथ्य जाणता गळते मिथ्य जिवा सत्य प्रकटता असत्य गायब रे धर्म अहिंसा पालन पथ्य जिवा गझल… पित्तासाठी मात्रा आहे सूतशेखर स्मशानातले पळवून लावे भूत शेखर जिनालयाच्या गाभाऱ्यातिल मूर्त शेखर नाभीराज अन मरुदेवीचा पूत शेखर मोक्षा गेला कैलासावर मुनि दिगंबर निर्वाणाचा जणू भासतो दूत शेखर कधी न अडके कुंडलीत…

    December 13, 2023
  • इंडिया – INDIA

    जाण डाव आडनाव गाव कोणते खरे गूढ त्या शिवालयात बाव कोणते खरे संगनमत संगणक न प्रीत शब्द जोडते बेल पर्ण रंग भोर ताव कोणते खरे दगड गुंड पावसात झिंग चिंब शेंदरी वाळती उन्हात पिंड भाव कोणते खरे रे स अर्थ काय रे रुमाल बीज मंत्र हा पुरुष स्त्री कुणी असोत राव कोणते खरे प्रश्न उत्तरातले…

    December 9, 2023
  • अपत्त्ये – APATTYE(OFF SPRING)

    अहंला झुकावेच लागे अती हाव भरण्या सुपाऱ्या फटाके फुटोनी नवा गाव भरण्या मना अंधश्रद्धा किती प्रिय तरीही मला ना तयांना कुटायास बत्ते खली भाव भरण्या कशाला करू आत्महत्या असे जैन मी हो जिवांनी जगावे पुन्हा वाटते घाव भरण्या खरी संपदा पुण्य माझे अपत्त्ये गुणांची खुशीने लिहावे नि गावे पुन्हा ताव भरण्या लगागा लिहू पाचवेळा उगाळून…

    December 6, 2023
  • कोवळे – KOVALE ( YOUNG)

    गझलेत हेच सोवळे म्हणे जून ना नवे कोवळे म्हणे फेकून तंत्र खोडून मंत्र जाहले हेच ओवळे म्हणे कोंदणी कशाला पाचु हिरे गुंफेन मोति पोवळे म्हणे शेरात गोडवा पीळ भरू बोटात घालु हो वळे म्हणे झटका देण्या सुनेत्रा उभी फटक्यात झायलो वळे म्हणे

    December 6, 2023
←Previous Page
1 … 48 49 50 51 52 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya