Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • बारसभा – Twelve Assemblies

    हे समवशरण भगवंताचे जिन तीर्थंकर भगवंताचे बारसभा भवताली भरली भगवंताची वाणी खिरली अठरा भाषा उपभाषांतुन गणधर करती सहज निरूपण सर्वांगातुन झरे शांतरस रत्नत्रय प्राप्ती होण्यास्तव मिथ्यात्वाचा नाश व्हावया जिनवाणीचा गाऊ महिमा

    October 15, 2026
  • मिस यू – Miss You

    कमरेला मी तुझा पुढाऱ्या कसा बांधुनी आज मिरवते कंबर कसण्या गाळ उपसण्या करी लेखणी बाज मिरवते कर्म बांधले आजवरी जे मला न चिंता बिंता त्याची गळ्यात काळी पोत आणखी जळणाऱ्यांची लाज मिरवते पोतराज अंगणात नाचे मारित फटके स्वतः स्वतःला पोत्यांचे पोतेरे त्याचे डोईवरचा ताज मिरवते संगमरवरी ताजमहाली बसून बेगम गझला लिहिते दुधी असूदे अथवा काशी…

    October 13, 2026
  • दुपार मौनी – Silent Noon

    झुकझुक गाडी मजेत धावे इंजिन घाली शीळ वळणावरती झुळझुळ वाऱ्या तुझी अंतरी शीळ सळसळणाऱ्या चाफ्यावर भुंग्यांचा भिंगत फेर कीड फुंकण्या पाकळ्यातली आली ओठी शीळ सुगंध ओल्या मृदेत भरण्या बकुळ फुलांचा सडा शिंपित जाई झुळूक शीतल घुमते कानी शीळ लाल गुलाबी धवल जांभळी सुमने फुलली छान रानपाखरू झुलत घालते फांदीवरती शीळ ऊन हिवाळी घाम काढते दुपार…

    October 12, 2026
  • कलादालन – ART GALLERY

    कलादालन तैलचित्रे कुशल करांची विशुद्ध किमया कलादालन भाव भरल्या सजल करांची विशुद्ध किमया चित्रांमध्ये या चाले  मुक्त जरी रंगांची दंगल कला दालन न्याय देण्या विमल करांची विशुद्ध किमया ऊर्ध्व वेग घे जलद गती ओंजळ भरली हृदय मंदिरी कलादालन ग्राम नगरी कमल करांची विशुद्ध किमया ध्येयवेडी ब्रम्हभूमी चैतन्याने सळसळणारी कलादालन सरळ वर्षा अनल करांची विशुद्ध किमया…

    October 9, 2026
  • ज्ञान – KNOWLEDGE

    सम्यक दर्शन अनुराग जिनांवर तन्मय होता मम राग जिनांवर स्तोत्र स्तुती रचते मी अक्षरांत ज्ञान शील तन धन राग जिनांवर

    October 9, 2026
  • देहाचं तारू – my body’s ship

    माझ्या देहाचं तारू देहाचं तारू मी सोडलंय ग माझ्या मनाचं वारू मी सोडलंय ग दर्याला भरती आलीया बाई आलीया तनामनाचं गलबत म्या सोडलंया बाई सोडलंया माझ्या मनाच्या शिडात जिनभक्तीचं वारं भरलया बाई भरलया माझ्या देहाचं तारू मी सोडलंय ग … माझ्या गळ्यात गाणं दाटलंय ग माझ्या तळ्यात पाणी झरतंय ग उरात अक्षर भांडार भांडार भरलाय…

    October 8, 2026
  • कैफियत – SITUATION

    हृदय सरोवर मम देहातील त्यात उमलले पद्म सुकोमल पद्म न लांच्छन पद्मपभूला ते तर शुद्धात्मा जिन ईश्वर सुमतीनाथ न चकवा देती तपोलीन तन आत्मा पक्षी अभिनंदन संभव तीर्थंकर अजितनाथ जिन वृषभ जिनेश्वर सुपार्श्व् स्वस्तिकात स्थापते अर्थ कधी ना विपरीत काढे म्हणून मन मम स्थिर शांतीत चंद्रप्रभूसम सिद्धशिलेवर मैफल भरली इथे वहीवर कैफियत मांडण्या भराभर लिहीत…

    October 3, 2026
1 2 3 … 291
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya