-
काळाला ना घाबरते – KALALA NA GHABARTE
धवल झेंडूचे गोंडस झेले बघत राहूदे आले गेले पर्णांच्या पोपटी मनावर झुंबर अंबर निळसर शेले … काळाला ना घाबरते वेळेला मी सावरते हृदयी माझ्या मम आत्मा मायपित्यांना आठवते … वाद नको संवाद हवा काव्याचा मज नाद हवा साद घालण्या खरी खरी आल्या पुन्हा शब्द सरी …
-
आत्महित – ATMAHIT
काळांना मी तिन्ही वापरे माझ्या आत्म्याचे हित करण्या लेखणीस मी सतत चालवे माझ्या आत्म्याचे हित करण्या आत्महिताला जो जाणे तो सहजच परहित करतो रे नी सा ग प म ध सारे माझ्या आत्म्याचे हित करण्या
-
मधुरस – MADHURAS
मुग्ध मधुरस माय मराठीचा मज मिळतो मुग्ध मधुमित माता मम्मीचा मज मिळतो मोरणी मी मित्रत्वाची मान मनोरम मुग्ध मालन माल मोजता मसि मध मिळतो
-
पूर्ण जीवन POORN JEEVAN
व्यवहारे जो जगे नये निश्चयाने त्याला मुक्ती वरे निश्चयाने सतमार्गाने जगावया पूर्ण जीवन आत्महिता मी जपे निश्चयाने