-
खस्ता – KHASTAA
शांत मी खाऊन ठेचा लालची खपवून ठेचा भामट्या त्या ज्योतिषांच्या कुंडल्या काढून ठेचा वाळवूनी जर्द मिरच्या देठ पण मोडून ठेचा ठेच पायांनाच लागे दगड ते शोधून ठेचा पोळले तिखटात तळवे घोटुनी वाटून ठेचा फिरुन वरवंटा गळाला ठेचतो लोळून ठेचा काढल्या खस्ता सुनेत्रा खावया पुरवून ठेचा
-
सवाई – SAVAI
जाहली शेरास सव्वा शेरणी दासी न आई धन्य पन्ना वाचलेली जाहली माझी रुबाई मुक्तकाच्या चार ओळी गात लिहिते ना लगावे गालगागा चार वेळा मी सुनेत्रा रे सवाई गालगागा गालगागा गालगागा गालगाई माळते कंठात कंठा लेखणी नाही कसाई ठेवते शेरावरी ह्या पावशेरा शर्वरी मम कंटकांनी वेढलेली पार करण्या खोल खाई आठमध्ये दोन जादा मिळवता दाही दिशांनी…
-
बिजली – BIJALEE
थंडावली घनात बिजली कडाडणारी थंडावली रणात बिजली कडाडणारी रंगून रंगवीत भिजली स्वरात राई थंडावली वनात बिजली कडाडणारी गागालगा लगाल गागालगा लगागा मात्रांसवे गणात बिजली कडाडणारी मेघांत गोठवून जलधार अंतरीची नाचे तनामनात बिजली कडाडणारी कातावल्या शरास धरता करी सुनेत्रा अंगी कणाकणात बिजली कडाडणारी
-
खात्री – KHATREE
माझ्या दुकानी सत्य कळते निर्जरेने घाटात झटकन चाक वळते निर्जरेने वळवीत मी पण शब्द गरगर मार्दवाने भाषा क्षमामय कर्म फळते निर्जरेने आहे करामत हीच माझ्या आर्जवाची तपताच काया विघ्न टळते निर्जरेने जीवास कोणाच्या न धोका पूर्ण खात्री घामास गाळत नीर गळते निर्जरेने गावे फुलांची विविध रंगी चिंब भिजली पुण्यास पाहुन पाप पळते निर्जरेने
-
हेड – HEAD(HED)
हे राजगुरुचे गाव सुद्धा खेड आहे मम गझल बंधन जीव जपण्या थ्रेड आहे असुदेत रे तव कातडीचा रंग काळा पण रंग रक्ताचा तुझ्याही रेड आहे हातात असुदे लेखणी तलवार जणु रे आपण अता दावूच त्यांना आपली ए ग्रेड आहे ब्रम्हांड पुरवी बालकांना माझिया जी अदृश्य शक्तीची सुरक्षा झेड आहे मम मान सुंदर मोरणीची शोभते मज…
-
उपचार – UPCHAR
कीड नडली पुन्हा बहर नडले कुठे पूर्ण उमलूनही पुष्प खुडले कुठे लाल अंगांग झाले रगडले कुठे चोर रंगेल हाती पकडले कुठे हा उन्हाळा नव्हे पावसाळा नव्हे नीर सांडे तरी भाव रडले कुठे मत्स्य भरतीतले रास जाळ्यामधे तप्त वाळूत मीन तडफडले कुठे कर्म प्राचीन जर धर्म संयम हवा कैक उपचार पण रोग झडले कुठे वीज नाचूनही…
-
राजधानी – RAJDHANI
पंकात वासनेच्या रुतले कधीच नाही कमळातले अली पण डसले कधीच नाही चढवून चिलखताला चिखलात खोल गेले तेथे निवास करणे रुचले कधीच नाही रंगून राजधानी सुकुमार भावनांची व्यापार त्यात करुनी फसले कधीच नाही घोटून अक्षरांना केली अशी करामत ठिणग्या करात फुलल्या विझले कधीच नाही तपवून पाप गेले देऊन पुण्य आले भिजले कृतज्ञ भावे रुसले कधीच नाही…