-
चीप -CHEEP
अजून केस मोकळे क्लीप पाठवून दे तिमिर पळुन जावया दीप पाठवून दे लिहू कसे अता तसे टोक मोडलेय रे लिहेन मी पुढे कधी नीप पाठवून दे झरत झरत भरत गात चालतेय लेखणी झरावया भराभरा जीप पाठवून दे भरावया हृदय घडे माठ घागरींसवे सुडौल घाटदारसे पीप पाठवून दे नकोत गोठ पाटल्या मिरवण्यास दो करी सुवर्ण कंकणे…
-
गोमटी – GOMATEE
एवढ्या गर्दीत होते एकटी जाहली जाणीव पण ती शेवटी ते मला म्हणतात ताई का बरे मी जरी आहे तयांहुन धाकटी जर रजा आहे हवी तर वाज रे मोकळे बरसून वेड्या घे सुटी सर्वजण म्हणतात मजला सावळी फक्त प्रियला वाटते मी गोरटी मी तुला सांगेन जे ते ऐक तू मी खरेतर गोरटी ना गोमटी
-
मनोगते-MANOGATE
मनात माझिया तुझ्या तसेच ते असेलही नसेलही तुला खरे कळूनही वळे न ते असेलही नसेलही हवेत मस्त गारवा तशात गात चालले धुके निळे तुला न का मलाच ते लपेटते असेलही नसेलही कधीतरी कुठेतरी तुला निवांत भेटण्यास यायचे कशास ही खुळ्यापरी मनोगते असेलही नसेलही दवात चिंब न्हायल्यावरी तुला दिसे कुणी जळी स्थळी विभोरता तुझी हवी मला…
-
नीर झुंबर- NEER ZUMBAR
उगवले मातीतुनी वर कैक अंकुर हे नवे बांधले गगनास जेव्हा नीर झुंबर हे नवे नाचरी आली हवा अन सान रोपे डोलती सज्ज ती करण्यास आता रोज संगर हे नवे उतरले यानातुनी मी सावळ्या रेतीवरी पाहता सागरतिरावर भव्य बंदर हे नवे लागले धक्क्यास गलबत त्यात होती बासने त्यातुनी मी उचललेले ग्रंथ सुंदर हे नवे गगनचुंबी उंच…
-
भरती – BHARATEE
अलवार भावनांना तुडवू नकोस आता शब्दांस ठोकुनीया घडवू नकोस आता खिडकीत लोचनांच्या पाऊस दाटलेला म्हणतो मला पडूदे अडवू नकोस आता भिजवून मृण्मयीला मृदगंध वाहु द्यावा कोंडून तप्त वाफा रडवू नकोस आता चाफ्यासमान प्रीती माझीच माझियावर दरवळ तिचा सुगंधी दडवू नकोस आता उठतात का शहारे पानांवरी वहीच्या पानांवरी फवारे उडवू नकोस आता गोंजार भावनांना बाळे जणू…
-
फळी – FALEE
मारू नको फुलाला म्हणते कळी मुक्याने तोडून काचणारी पर साखळी नव्याने तू ओरडून तेव्हा केला किती तमाशा आता कशास देशी प्राणी बळी मुक्याने वाढून भरभरूनी रसदार लाल भाजी चमच्यांस पाक गोष्टी सांगे पळी मुक्याने फुकटात पाजणारे मधल्यांस डोस येता प्राशून डोस पिचली मधली फळी मुक्याने पाण्यात पोहुनीया येता वरी सुनेत्रा जाऊन गाळमाती बसली तळी मुक्याने
-
प्याली – PYAALEE
प्याले भरून प्याली ओठी धरून प्याली बिंबास कांचपात्री बघते झुकून प्याली न्हाऊन सप्तरंगी माझी तरूण प्याली लाखो जिने बिलोरी आली चढून प्याली गझलेत पेय उसळे फेसाळत्या नशेचे गाठूनिया तळाला आली तरून प्याली केले जरी रिकामे फटक्यात रांजणाला त्याला पुन्हा भराया अजुनी टिकून प्याली नसता कुणी पहाया मस्तीमधे स्वतःच्या नेत्रात दो शराबी जाते बुडून प्याली मातीत…